इंदिरा प्रियदर्शिनी

 

येत्या एकोणीस नोव्हेंबरला इंदिरा गांधींची जन्म शताब्द्युत्तर प्रथम जयंती आहे. म्हणजेच त्या आज हयात असत्या तर एकशेएक वर्षे वयाच्या असत्या. स्वातंत्र्योत्तर भारतावर ज्याप्रकारे इंदिरा गांधींनी ठसा उमटवला ती विस्मयकारक आणि अद्वितीय बाब आहे. भारताच्या राजकारण आणि समाजकारण या दोहोंवर इंदिरा गांधींच्या जीवनकालाचा आणि कार्यकर्तृत्वाचा फार मोठा प्रभाव आहे. मुख्यत: विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इंदिराजींची लोकप्रियता आणि राजकारणावरचा दबदबा अफाट होता. यामुळेच स्वातंत्र्योत्तर भारताच्या मध्यवर्ती सत्तेध्ये आणि देशातील बहुतांश राज्यांध्ये सत्ता असणार्‍या काँग्रेस पक्षाला ‘‘इंदिरा काँग्रेस’’ असेच संबोधले जायचे. एका विद्वान राजकारणी व्यक्तीने तर ‘‘इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा’’ असेच समीकरण मांडले होते. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान असताना, तब्बल पंधरा-सोळा वर्षे त्या, पंतप्रधानांची कन्या या नात्याने नेहरूजींची सावली बनल्या होत्या. त्यानंतर लालबहाद्दूर शास्त्रींचा साधारण दीड वर्षांचा पंतप्रधानपदाचा कालखंड सोडल्यास परत त्या पंतप्रधानपदी विराजमान होऊन सत्तेच्या केंद्रस्थानी आल्यात त्यांचा पंतप्रधानपदाचा हा काळ साधारण सोळा वर्षे एवढा होता. या संपूर्ण कालखंडामध्ये (1977 ते 1979 वगळता) त्यांचे निवासस्थान सफदरजंग हे होते. इंदिराजींचे निवासस्थान असल्याने, 1, सफदरजंग रोड, नवी दिल्ली हे ठिकाण बर्‍याच मोठ्या घडामोडींची साक्षीदार असणारी आणि एका महान व्यक्तीचे सान्निध्य लाभलेली वास्तू आहे.माझ्या सुदैवाचे काहीच दिवसांपूर्वी मी या वास्तूध्ये म्हणजे ‘‘इंदिरा गांधी स्मृती’’ येथे जाऊन आलो.

 

 

 

 

एका सुखवस्तू सामान्य माणसाचे घर असावे तसेच हे भारतासारख्या विशाल देशाच्या अफाट लोकप्रियता लाभलेल्या पंतप्रधानांचे घर होते. घराच्या बाहेर सुरुवातीलाच फुलांच्या ताटव्यामध्ये कोरलेले ‘’I am Courage’’ (आय अ‍ॅ करेज) हे शब्द लक्ष वेधून घेतात. यामागची पार्श्‍वभूमी स्पष्टच आहे. हुशारी, चातुर्य, विवेक, विनयशीलता याचबरोबर साहस आणि शौर्य हा त्यांचा अलौकिक गुण होता. याचमुळे त्यांच्या संपूर्ण कालखंडातील निर्णयप्रक्रियेध्ये आणि धोरण निश्‍चितीमध्ये ही बाब प्रकर्षाने जाणवते.

 

1, सफदरजंग रोड या त्यांच्या सरकारी बंगल्यामध्ये त्यांची स्मृती चाळताना मी जेव्हा त्या  घराच्या छोटेखानी दालनांध्ये फिरत होतो, तेव्हा मला सर्वप्रथम इंदिराजींच्या ‘‘सामान्यांतील (अति) असामान्य’’ अशाच व्यक्तिमत्त्वाची जाणीव होत होती. सर्वसाधारणपणे सरकारी बंगल्यांध्ये असावे असेच, गाडी येण्याजाण्यासाठीचे पोर्च, त्यापुढे एक व्हरांडा, तिथूनच त्याला लागून असणारा छोटेखानी अभ्यागत कक्ष आणि पुढे दिवाणखाना म्हणजेच ड्रॉईंगरूम. या ड्रॉईंगरूममध्येच बैठकीसाठी दोन ते तीन सोफासेट मांडलेले होते. याशिवाय इंदिराजींनी छंदपूर्वक जोपासलेल्या काही गोष्टी ज्यामध्ये भिंतीवरील पेंटिंगपासून दगड-गोट्यांचाही समावेश आहे; त्या ठेवलेल्या होत्या. याच्याशेजारी‘‘अध्ययन कक्ष’’ – सर्वसामान्यपणे असावा तसाच. काही पुस्तकांची कपाटे, टेबल खुर्ची त्यावर सामान्य लोक वापरतात तसेच पेन आणि लिखाणाचे अन्य साहित्य ठेवलेले होते. याला लागूनच पुढे शयनकक्ष, तोसुद्धा सामान्यच, कुठेही भपकेबाजपणा नसलेला. अध्ययनकक्षाचे एका बाजूला डायनिंगरूम (भोजनकक्ष) तीसुद्धा कुठलाही बडेजाव न मिरवणारी अशी, सर्वसाधारण सोयींनी युक्त आणि छोटेखानी खोली. त्याच्याच पुढे गेल्यानंतर इंदिराजींच्या देवघराची लहान खोली आहे. या ठिकाणी पूजेचे सर्वच साहित्य नीट मांडून ठेवलेले दिसते. याशिवाय शंकराची पींड आणि इतर देवीदेवतांचे मर्यादितच फोटो आणि मूर्ती प्रकर्षाने दिसतात. याशिवाय या घरामध्ये त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू जसे पर्स, चष्मा, चपला, घड्याळ (Wrist – Watch) यावर 1982 च्या दिल्लीतील नवव्या आशियाई स्पर्धेचा लोगो आहे. बघायला मिळाल्यात. सर्वच वस्तू अतिसाधारण अशाच प्रकारच्या. हे दिसल्यानंतर त्यांचेप्रति असणारा आदर आणि आकर्षण वाढले नसते तरच नवल होते. 1, सफदरजंग रोड हे राजीव गांधींचेही मार्च 1985 पर्यंत निवासस्थान होते. त्यामुळे त्यांचा 1984 च्या निवडणुकीदरम्यान वापरलेला सुप्रसिद्ध लॅपटॉप (कॉम्प्युटर) सुद्धा या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे.

 

इंदिराजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जागतिक राजकारणात शीतयुद्ध सुरू होते. तत्कालीन सोव्हियत युनियन आणि अमेरिका यामध्येच बर्‍याच देशांची विभागणी झाली होती. द्वितीय विश्‍वयुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या आणि साधारण त्यापूर्वीच्या काळात पारतंत्र्यात असणार्‍या देशांची तिसरी आघाडी अलिप्ततावादी देशांच्या ‘‘नाम’’ चळवळीने नेहरूंनी उघडली. या आघाडीचे नेतृत्व आधी नेहरूंनी आणि नंतर इंदिराजींनी अतिशय समर्थपणे केले. यामुळे जगातील आघाडीच्या नेत्यांध्ये त्यांची गणना होऊ लागली. क्युबाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचेपासून ते पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यचळवळीचे नेते यासर अराफत यांच्यामार्फंत त्यांचे वैयक्तिक संबंध होते. बांगलादेशच्या निर्मितीवेळी ‘‘मुक्तिवाहिनी’’ आणि शेख मुजीबुर रहमान यांना पाठिंबा देऊन त्यांनी आपल्या मुत्सद्दीपणाचे दर्शन समस्त जगाला घडवले. 1975 मध्ये पोखरण येथे अणुस्फोट करून तर इंदिराजींनी सर्वच जागतिक मुत्सद्द्यांना अचंबित केले. याच वर्षी सिक्कीमला भारतात अधिकृतपणे सामील करून घेतले. हीसुद्धा त्यांच्या मुत्सद्दीपणाची आणि चाणाक्ष नेतृत्वाची बाब ठरली. इंदिराजींच्याच कार्यकाळात नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान या सर्वच शेजारी देशांध्ये भारताबद्दल आदर आणि दबदबा वाढीला लागली. रिचर्ड निक्सन आणि नंतर रोनाल्ड रेगन या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध थोडे ताणलेलेच होते. परंतु ती कसर इंदिराजींनी, लिओनिस ब्रेझनेव्ह आणि त्यापूर्वीच्या सोव्हियत राष्ट्राध्यक्षांबरोबर निकटता वाढवून पूर्ण केली. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण हा त्यांचा निर्णय क्रांतिकारी होता. एकाचवेळी एकोणीस बँकांना एका छत्राखाली आणून जनताभिमुख होण्यास याद्वारे बाध्य केले गेले. 1980 मध्ये भारताने ‘रोहिणी’ ही शृंखला अवकाशात प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. ASLU, PSLV आणि GSLV अशा टप्प्याटप्याने भारताने यान प्रक्षेपण (उपग्रह प्रक्षेपक) क्षमता प्राप्त केली. यामागे इंदिराजींच्या कल्पक नेतृत्वगुणांचा सिंहाचा वाटा होता. एक महत्त्वाची मोहिम भारताने 1982 मध्ये फत्ते केली. डॉ. एस्. झेड. कासिम यांचे नेतृत्वाखाली भारताने अंटार्क्टिकावर आपला दक्षिण गंगोत्री नावाचा तळ स्थापन केला. यामागची पार्श्‍वभूमी महत्त्वाची आहे. सुरुवातीपासून हिंदी महासागरावर चीनपेक्षा आपले प्रभुत्व जास्त आहे. इंदिराजींना चीनच्या अंटार्क्टिका मोहिमेचा आणि त्याद्वारे हिंदी महासागरामध्ये शिरकाव करण्याचा मोहिमेचा सुगावा लागला आणि तत्क्षणी ‘अंटार्क्टिका वारी’ हाती घेण्यात आली आणि यशस्वीसुद्धा झाली. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा, त्यांच्याच प्रेरणेने रशियाच्या मदतीने अवकाशात पोहोचला. इंदिराजींचे नेतृत्वगुण आणि कौशल्य वादातीत होते. याचमुळे या काळात RTI (Research & Analysis Wing) चा दबदबा वाढला. त्यावेळी NSA राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पद वा व्यक्ती नव्हते पण आजच्याप्रमाणे श्री. अमित डोव्हाल यांचा दबदबा आहे तसाच त्यावेळी RAW चे प्रमुख आर्. एस्. काव यांचा होता. भारतात नवव्या आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने दूरदर्शनची आणि रंगीत दूरदर्शनची क्रांती इंदिराजींमुळे झाली.

 

राजकारणाबाहेर इंदिराजींची निकटता अनेक साहित्यिक, विद्वान, कलाकार यांचेध्ये होती. पुपुल जयकर, अमृता प्रितम, सर रिचर्ड अ‍ॅटनबरो, ललितकला अकादमीचे तत्कालीन अध्यक्ष आणि प्रसिद्ध शिल्पकार संख्यो चौधरी, एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी, आर्. के. नारायण ही नावे वानगीदाखल देता येतील. परंतु राजकारणामध्ये त्यांचे कुणीही मित्र नव्हते. मार्च 1984 इंदिराजींना भेटायला गेल्यानंतर कशाप्रकारे त्यांनी इतर मंत्र्यांना बाहेर कक्षात थांबवून आर्. के. नारायण यांना भेटायला प्राथमिकता दिली, याचे वर्णन त्यांनी छान केले आहे.

 

1972 चा दुष्काळ आणि त्यानंतरची परिस्थिती, गिक शिथिलता या काही त्यांच्या कार्यकाळात असणार्‍या नकारात्मक बाबी होत्या. परंतु या सर्वांव्यतिरिक्त पंजाबचा उग्र होत जाणारा प्रश्‍न, तेथील दहशतवाद त्याला असणारा कॅनडा, इंग्लंड आणि देशांचा अप्रत्यक्ष पाठिंबा हे त्यांच्यासाठी जास्त त्रासदायक ठरेल. पंजाबच्या समस्येवर त्यांनी 2 जून 1984 रोजी ऑपरेशन ब्लू स्टारद्वारे वज्राघात केला. चार ते पाच दिवस ही मोहीम अमृतसरच्या सुवर्णंदिरात सुरू होती. ‘हरमंदिर साहिब’ येथून संत जर्नेलसिंग भिंदरानवाले आणि शेवटचा दहशतवादी यमसदनास धाडूनच ती 6 जून 1984 ला आटोपली. यापूर्वीची परिस्थिती फारच दाहक आणि गंभीर होती.  परंतु ऑपरेशन ब्लू स्टार द्वारे इंदिराजींनी ती नियंत्रणात येण्यास यश मिळवले. दुर्दैवाने याच घटनेने त्यांची हत्या झाली. आयरिश टेलिव्हिजनच्या पीटर उस्तीनोव्ह आणि त्यांच्या सहकार्‍यांना त्यांच्याच निवासस्थानातील बगीच्यामध्ये भेटायला जाताना त्यांची अंगरक्षकांनी निर्दयीपणे हत्या केली आणि इंदिरापर्व एकप्रकारे संपले.

 

‘माया’’ नावाचे एक प्रसिद्ध नियतकालिक त्याकाळी प्रकाशित व्हायचे. त्यांच्या हत्येनंतर प्रकाशित केलेल्या अंकाचे शीर्षक होते. ‘‘गूँगी गुडिया बनी देश की मुखर नेता।’’

 

लेखक: प्रतिश पंडित
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *