इये रंगभूीचिये नगरी…

नाटकाचा विचार रंगभूीशिवाय अशक्य! रंगभूी  म्हटले की, अंधुकसा उजेड, लाकडी स्टेज, विंगेत जाणवणारी अस्पष्ट, दबकी धावपळ, तिसरी घंटा आणि तो भव्य मखमली लाल पडदा उघडण्याची उत्कंठा असे सगळेच नजरेसमोरून  अद्भुतासारखे तरळत जाते.

 

इथे मला नासिरुद्दिन शहांच्या आत्मचरित्रातला मजकूर आठवतो. ‘बंद पडदा  उघडण्यापूर्वी पडद्यामागे उभे राहताना आईच्या गर्भात असल्यासारखे वाटते.’ असे ते म्हणतात! त्या अवस्थेचे इतके नितांत सुंदर वर्णन कुणी करूच शकणार नाही, याविषयी मला खात्री आहे. नाट्यकलेच्या जन्माचे विवेचन करणारे भरतमुनी असोत की सार्‍या जगालाच एक रंगभूी मानणारा शेक्सपिअर असो; प्राचीन काळापासून ते आजतागायत रंगभूीचे अद्भुत विश्‍व कित्येकांना भुरळ पाडत आले आहे.

 

5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूी दिन! यामागची कथा म्हणजे – सांगली संस्थानचे अधिपती अप्पासाहेब पटवर्धन कलेची जाण असणार्‍यांपैकी एक, 1842 च्या आसपास कर्नाटकमधील ‘करकी’ या गावातील करकी मेळा नावाची मंडळी यक्षगान भागवताचा खेळ करण्यासाठी सांगलीमध्ये आली होती. त्यांचे ते सादरीकरण पाहून  अप्पासाहेब पटवर्धन प्रभावित झाले आणि याहीपेक्षा उत्कृष्ट नाटक आपल्याकडे सादर व्हावे अशी इच्छा त्यांनी विष्णुदास भावे यांच्याकडे व्यक्त केली. यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही त्यांनी कबूल केले. विष्णुदास भावे यांनी कानडी नाट्यात काही फेरफार करून कल्पनेची जोड देऊन ‘सीता स्वयंवर’ हे नाटक रचले व सादर केले.

 

या मराठी नाटकाचा शताब्दी   सोहळा 5 नोव्हेंबर 1943 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत साजरा झाला. तेव्हापासून तो दिवस ‘मराठी रंगभूी दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले. असे कोणतेही ज्ञान, शिल्प, विद्या, कला, योग व कर्म नाही, जे नाट्यात प्रदर्शित करता येत नाही’ असे भरतमुनींनी म्हटले आहे. इ. स. 1843  सून मराठी  नाट्यकला हळुहळू आकाराला येऊ लागली. मराठी नाटकाची परंपरा विष्णुदास भावे यांच्यापासून सुरू होते. खाडिलकर, कोल्हटकर, गडकरी, अत्रे, किर्लोस्कर, देवल, तेंडुलकर, एलकुंचवार यांसारख्या दिग्गजांनी ही परंपरा पुढे समृद्ध केली.

 

आंगिक कलांचा व्यक्तिश: किंवा समुदायाने आविष्कार करण्याची भूी किंवा स्थान म्हणजे रंगभूी’ अशी रंगभूीची शब्दश: व्याख्या सांगता येईल. इंग्रजीतील ‘थिएटर’ या संज्ञेला समानार्थी ठरेल अशा अर्थाची ही भारतीय संज्ञा आहे.

 

थिएटर’ या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे ‘पाहणे’ किंवा ‘पाहण्याच्या जागा’ असा होय. प्राचीन काळातील  ग्रीस किंवा प्राचीन भारतातही नाटके होत असत. वीस पंचवीस हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था असलेली नाट्यगृहे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली असत. आणि त्यांचा आकार अर्धवर्तुळाकार असे. प्रबोधनकाळात (रेनेसाँ) इंग्लंडमध्ये पक्की बांधलेली नाट्यगृहे आली. आधुनिक काळात पक्क्या बांधलेल्या नाट्यगृहात रंगमंचासाठी चौथरा  तयार केलेला असतो. रंगमंच झाकण्यासाठी दर्शनी पडदा असतो. डाव्या आणि उजव्या बाजूस ‘विंग्ज’ असतात. पूर्वी नाटकाच्या आवश्यकतेनुसार दृश्ये चित्रित केलेले पडदे असत. हल्ली ‘सेट’ उभारला जातो. या रंगमंचाला ‘कमानी रंगमंच’  म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास रंगभूी ही सामुदायिक स्वरूप असलेली कला आहे. नाट्यसंहिता, कलावंत, नाट्यदिग्दर्शक, कलावंतांची रंगभूषा व वेशभूषा, रंगमंदिर, त्यातला रंगमंच, नेपथ्य, प्रकाशयोजना, प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक यात समाविष्ट होतात.

 

 

 

महाराष्ट्रात प्राचीन काळात लिखित नाटके फारशी सापडत नाहीत. परंतु रामायण किंवा महाभारतावरील आख्याने, त्यातील नाट्यमय प्रसंग यांची वर्णने आहेत. 1818 नंतर इंग्रजी राजवटीत इंग्रजी व संस्कृत नाटकांच्या भाषांतराच्या रूपाने लिखित नाटके आढळतात. सुरुवातीच्या नाटकांवर इंग्रजी नाटकाचा प्रभाव होता. हळुहळू स्वतंत्र अशी मराठी नाट्यसृष्टी उदयास आली. 1880 ते 19820 या काळात किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, खाडिलकर आणि गडकरी हे पाच महत्त्वाचे नाटककार होऊन गेले संगीत रंगभूीचा हा सोनेरी कालखंड समजला जातो. 1933 मध्ये मराठी रंगभूीसंदर्भात घडलेली महत्त्वाची घटना म्हणजे ‘नाट्यमन्वन्तर’ या संस्थेची स्थापना या संस्थेने ‘आंधळ्यांची शाळा’ हे नाटक रंगभूीवर आणले. मराठी रंगभूीच्या आधुनिकतेचा, प्रायोगिकतेचा प्रारंभ याच नाटकाने केला असे मानले जाते. स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1950 ते 60 या दशकात नाटककारांची नवी पिढी आकारास आली. वसंत कानेटकर, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर ही त्यांपैकी प्रमुख नावे. रंगभूीच्या संदर्भात 1960 ते 1980 ही दोन दशके बरीच घडामोड होत राहिली. नवनवीन नाट्यसंस्था उदयास  आल्या. नाट्यकृतींम ध्ये विविध प्रयोग करण्यात आले, तसा प्रेक्षकवर्गही वाढत गेला.

 

सत्यदेव दुबे यांच्या ‘थिएटर युनिट’ या संस्थेने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून अनेक दर्जेदार प्रयोग केले. ‘आधेअधुरे’, हयवदन’ ‘ययाति’,पगला घोडा’ इत्यादी गाजलेल्या नाटकांचा यात उल्लेख करता येईल. दुबे यांनी भारतीय स्तरावरच्या नाटकांची ओळख मराठी नाटककारांना करून दिली. त्यामुळे नाट्यातील प्रायोगिकता वाढीस लागली.

 

नटसम्राट’, वीज म्हणाली धरतीला’, ऑथेल्लो’, ययाति आणि देवयानी’ यांसारख्या नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीला समृद्ध करणारे वि. वा. शिरवाडकर नाटकाविषयी म्हणतात – ‘लेखकाला नाटक नेके कुठे आणि कशात सापडते याबाबतीत अनेकांची अनेक उत्तरे संभवतील. माझे उत्तर माझ्यापुरते असे आहे, की मला नाटक हे नेहमी व्यक्तीत माणसाच्या स्वभावधर्मात, त्याने भोवतालच्या परिस्थितीशी केलेल्या संघर्षात सापडलेले आहे.

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही संस्था मराठी रंगभूीविषयक काम करणारी संघटना आहे. या परिषदेतर्फे 1905 ते 1966 या कालावधीत 66 नाट्यसेंलने भरविली गेली. या परिषदेने कलाकार संघ, रंगमंच कामगार संघ, निर्माता  संघ अशा संघटना उभारल्या. गरजू कलावंतांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘कलावंत निधी’ निर्माण केला.

 

कलाकार लानंदात स्वत: मग्न असतोच. तसेच तो रसिकांनाही तृप्त करत असतो. कलेच्या डोहातील हे आनंदतरंग मराठी रंगभूीवर उमटताना दिसतात. मराठी रंगभूी अनेक दिग्गजांनी फुलविली, वाढवली आणि समृद्ध केली. आजच्या रंगभूीविषयी पर्यायाने नाट्यकृतींविषयी संमिश्र मते ऐकायला मिळतात. काहींच्या मते नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ संपला तर काही रसिक, समीक्षक नव्या प्रयोगांचे निर्मितीचे स्वागत करतात.

 

मराठी रंगभूीच्या तीस रात्री’

एक सामाजिक आणि राजकीय इतिहास या त्रिखंडीय ग्रंथातील एका लेखात मकरंद साठे म्हणतात. ‘आजची रंगभूी तीही बर्‍याच पातळीवर गोंधळलेली आहे, तिची अंळ गोची झाली हे उघड आहे. परंतु याचा अर्थ महत्त्वाची नाटकं आज अजिबातच होत नाहीत असा नव्हे. अनेक महत्त्वाचे प्रयोग केले जात आहेत. मराठीत मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग आजही नाटकाकडे ओढला जात आहे.काही महत्त्वाची नाटकं जरूर येताहेत. ही नाटकं आजच्या व्यमिश्र  वास्तवाला भिडण्याचं शिवधनुष्य पेलण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा नाटकांची संख्या मात्र हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच आहेत.’

 

मराठी रंगभूी दिनानिमित्त अनेक ठिकाणी  नाटकांचे प्रयोग होतात. नाट्यस्पर्धा पार पडतात व्हर्च्युअल’ जगाच्या करमणुकीत रमलेल्या तरुण वर्गाचा मात्र या नाट्यकृतींना भरभरून प्रतिसाद नाहीच. मराठी रंगभूीने अनेक चढउतार पाहिले. रंगभूीच्या पडत्या काळात काही नाट्यलेखकांनी, कलावंतांनी ती सावरण्याचा  कसोशीने प्रयत्न केला.

 

मराठी रंगभूीने आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. प्रायोगिक व व्यावसायिक पातळीवर मराठी रंगभूीने आपले स्थान भारतीय रंगभूीच्या इतिहासात उल्लेखनीय ठेवण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या  नाट्यस्पर्धांनी कितीतरी नट, नाटककार तंत्रज्ञ रंगभूीला दिले.

 

शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील मुख्य पात्र गणतपराव बेलवलकरांच्या तोंडी एक वाक्य आहे. ‘संदेश नाटककाराने द्यावयाचा असतो. आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे टाकणारे.’ नाटककाराने उभी केलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर सादर करणे एवढेच नट करतो, या भावनेतून विनयाने जरी नट हे म्हणत असला, तरी मराठी रंगभूीला स्वत:चे असे अढळ स्थान मिळवून देणारे कितीतरी नट रंगभूीचा प्राण आहेत. त्यात बालगंधर्वांपासून ते श्रीराम लागू, भक्ती बर्वे यांच्यापर्यंत आणि एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगण्यासाठी नाटकाचा रस्ता जवळ केलेल्या आणि संघर्ष करणार्‍या आजच्या तरुणांपैकी काही उदाहरणांपर्यंत कित्येक नावे घेता येतील.

 

नाट्यकला स्वर्गातून पृथ्वीवर कशी अवतरली ते नाट्यशास्त्राच्या अखेरच्या दोन अध्यायात सांगितले आहे. भरताचे पुत्र नाट्यप्रयोग करीत असताना त्यांनी ऋषींची ग्राम्य भाषेत कुचेष्टा केली. संतप्त ऋषींनी त्यांना शाप दिला व भरताची मुले पृथ्वीवर येऊन नाट्यकलेचे दर्शन घडवू लागली. ती शापितअसल्यामुळे नाट्यकला सादर करणार्‍या नटांचा दर्जा / समाजातील स्थान हीन मानले जाऊ लागले आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे.

 

आज नाट्यकलेचे रीतसर प्रशिक्षण देणार्‍या संस्था आहेत. हौसेने या क्षेत्राकडे वळणारे आहेत तसे संपूर्ण आयुष्य रंगभूीला वाहून घेणारेही आहेत. या क्षेत्राचा ‘करिअर’ म्हणून विचार करण्याचे धाडस आत्ताच्या पिढीत आहे. ही बाब आता सामान्य होत चालली आहे. रंगभूीशी पुसटसा का होईना बंध जोडलेला असणार्‍या प्रत्येकासाठी ही  अभिमानाची गोष्ट! तरीही हा प्रतिसाद वृद्धिंगत व्हावा, मराठी रंगभूीची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी अधिक प्रयत्न व्हावेत.

 

रंगभूी आणि नाटक या दोन गोष्टी एकमेकांत बेालू मिसळल्या असल्या तरी ‘नाटककाराने लिहिलेल्या नाटकाला रंगमंचावर सादर करणे’ या रूढ समजुतीहून नाटक ही गोष्ट वेगळी आहे का असा प्रश्‍न उपस्थित करणारी नाटके  म्हणजे ‘एक शून्य बाजीराव’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ ही होत अतिशय कल्पक प्रयोग करताना या नाटकांनी रंगभूीची व्याख्याच बदलून टाकली. या नाटकांध्ये पडदा उघडल्याबरोबर नाटक सुरू होत नाही. तर नाटकाच्या प्रयोगाविषयी चर्चा सुरू होते. एक शून्य बाजीराव’ मध्ये तर नाटकाच्या आत नाटक दाखविले आहे. हे आणि यासारखे अनेक प्रयोग रंगभूीवर होत आलेत आणि यापुढेही मराठी रंगभूी अनेक वळणे घेईल मराठी रंगभूी दिनानिमित्त का होईना पण 64 कलांपैकीच्या या कलेचा आस्वाद घेण्यासाठी एखादं नाटक पाहायला जाणं संयुक्तिक ठरेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *