आशियाई खेळ आणि भारत

यावर्षी इंडोनेशियामधील जकार्ता येथे होत असलेल्या 18 व्या आशियाई खेळांध्ये भारताने पहिल्या तीन दिवसांत दहा पदके जिंकली आहेत. ही विजयी घोडदौड बघता हे वर्ष आशियाई खेळांमध्ये भारतासाठी सर्वात विक्रमी वर्ष ठरेल, अशी आशा सवांनाच आहे. याच निमित्ताने आज आपण पर्यंतच्या आशियाई खेळांधील भारताच्या काम गिरीचा आढावा घेणार आहोत.

आशियाई खेळांविषयी बोलू काही…

आशियाई खेळ हा ऑलिंपिक्सनंतरचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. नानाविध खेळांनी युक्त असलेला हा कार्यक्रम दर चार वर्षांनी आशिया खंडामध्ये संपन्न होतो. त्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मान्यतादेखील मिळाली आहे.

दुसर्‍या महायुद्धानंतर आशिया खंडातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. याच पार्श्‍वभूमीवर सर्व आशियाई देशांचे प्रतिनिधित्व असलेल्या आशियाई खेळांच्या कल्पनेस मूर्तरूप आले आणि साली भारतात नवी दिल्ली येथे पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन झाले.

1978 सालापर्यंत एशियन गेम्स फेडरेशनद्वारे या खेळांचे नियमन होत होते; मात्र 1982 पासून ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया त्यांचे व्यवस्थापन पाहू लागली. आतापर्यंत नऊ देशांमध्ये या स्पर्धांचे आयोजन झाले आहे आणि 46 राष्ट्रांनी या खेळांध्ये भाग घेतला आहे.

या कार्यक्रमातील खेळांची रचना ऑलिंपिक्सप्रमाणेच असते; मात्र हा कार्यक्रम आशियाच्या खेळसंस्कृतीचे देखील प्रतिनिधित्व करतो. उदा. आग्नेय आशियातील sepak takraw, दक्षिण आशियातील कबड्डी, पूर्व आशियातील वूशु खेळ इत्यादी. दरवर्षी काही नवे खेळ अंतर्भूत होतात, तर काही रद्द केले जातात; मात्र आशियाई खेळांच्या इतिहासात एकूण 44 खेळांचा समावेश होतो.

भारत आणि आशियाई खेळांचे नाते :

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1947 च्या मार्च महिन्यात जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे Asian Relations Conference  भरण्यात आली होती. या परिषदेत हजर असलेल्या देशांच्या प्रतिनिधींसमोर प्रो. गुरू दत्त सोंधी यांनी आशियाई खेळांची कल्पना मांडली होती. भारत आशियाई खेळांचा संस्थापक सदस्य आहे. 1951 व 1982 या दोन वर्षी भारताने या खेळांचे यजमानपद भूषवले आहे.

यावर्षीसकट सर्व 18 आशियाई खेळांध्ये भाग घेणार्‍या सात राष्ट्रांध्ये भारताचा समावेश होतो. इंडोनेशिया, जपान, फिलिपाइन्स, श्रीलंका, सिंगापूर आणि थायलंड हे भारताव्यतिरिक्त इतर सहा देश आहेत. भारत आणि जपान या केवळ दोन राष्ट्रांनीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये किमान एक तरी सुवर्णपदक मिळवलेले आहे.

आशियाई खेळांधील भारताची कामगिरी :

आशियाई खेळांध्ये भारत एक तुल्यबळ स्पर्धक मानला जातो. गेल्या 17 खेळांध्ये भारताने एकूण 139 सुवर्णपदके, 178 रौप्यपदके आणि 299 कांस्यपदके मिळवली आहेत. 2014 नंतर स्पर्धक देशांध्ये भारत सहाव्या पदावर आहे. 1990चा अपवाद वगळता सर्व आशियाई खेळांध्ये भारत पहिल्या दहा देशांध्येच राहिलेला आहे.

1951 सालच्या पहिल्यावहिल्या आशियाई खेळांध्ये भारताने 15 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्यपदके जिंकली होती आणि दुसरे स्थान पटकावले होते. 2010 साली भारताने आतापर्यंतचा आपला सर्वश्रेष्ठ खेळ दर्शवला होता. त्यावर्षी भारताच्या खात्यात 14 सुवर्णपदकांसहित एकूण 64 पदके होती. याउलट, 1990 सालची भारताची काम गिरी सर्वात वाईट होती. त्यावर्षी भारताला केवळ एक कबड्डीचे सुवर्णपदक, आठ रौप्यपदके आणि कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले होते.

आशियाई खेळांधील इतर सर्व खेळांच्या तुलनेत भारताची अ‍ॅथलेटिक्समधली कामगिरी सर्वोत्तम राहिलेली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये अ‍ॅथलेटिक्समधील आपल्या खेळाचा दर्जा खालावला असला तरी, भारताच्या एकूण 139 सुवर्णपदकांपैकी 72 पदके अ‍ॅथलेटिक्स खेळांचीच आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये कुस्तीमध्येदेखील भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपल्याकडे कुस्तीमधील एकूण सात सुवर्णपदके आहेत. सुशील कुमार, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट हे भारताचे आघाडीचे कुस्तीपटू आहेत. एशियाडमध्ये अ‍ॅथलेटिक्स खेळात भारत तिसर्‍या क्रमांकावर तर कुस्तीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

कबड्डीमध्ये भारत पहिल्या स्थानावर असून आपल्याकडे कबड्डीची नऊ सुवर्णपदके आहेत. एकूण सात सुवर्णपदकांसह नेबाजीतील भारताचा खेळही उंचावत आलेला आहे. याव्यतिरिक्त टेनिस, हॉकी, बॉक्सिंग या खेळांधील भारताची कामगिरी दर्शनीय आहे.

करावी किती आता वंचना..

प्रत्येक आशियाई खेळांध्ये खेळणारा भारत देश नंतर एकावेळी 1951 सुवर्णपदकेदेखील मिळवू शकलेला नाही. आशियाई खेळांध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकावर असलेल्या चीन आणि जपानने प्रत्येकी 3000 हून अधिक पदके कमावलेली आहेत आणि 135 कोटी लोकांचा भारत देश केवळ 606 पदके बाळगून आहे. 2010 साली 64 पदकांसह भारताने आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी दाखवली होती. त्यावर्षी सुवर्णपदकांसहित चीनच्या खात्यावर एकूण 412 पदके जमा होती.

आतापर्यंतच्या 17 एशियाडमध्ये भारत केवळ 1951 आणि 1662 या दोनच वर्षी पहिल्या तीन क्रमांकांध्ये येऊ शकला आहे. 2010 सालीदेखील भारत सहाव्या स्थानी होता.

त्याचप्रमाणे अ‍ॅथलेटिक्ससारख्या काही ठराविक खेळांमध्येच भारत प्रभुत्व दर्शवत आलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात कुस्ती, नेबाजी, कबड्डी, बॅडमिंटन, टेनिस या खेळांध्ये अनेक कुशल खेळाडू पुढे आले आहेत व भारताचे नाव उंचावत आहेत; मात्र फुटबॉल, पोहणे, वजन उचलणे, रोइंग, स्क्वॅश या खेळांधील भारताची प्रगती तितकीशी समाधानकारक नाही. व्हॉलीबॉल, सायकलिंग, जुडो, वूशु, तैक्वॉन्दो या खेळांच्या नशिबात अजूनही अंधारच आहे.

पालकांची खेळांप्रतीची उदासीनता, खेळाडूंसाठी आवश्यक सोयीसुविधांचा अभाव, निधीची कमतरता, भ्रष्टाचार, लोकप्रिय खेळांकडे झुकता कल अशा अनेक तांत्रिक व सामाजिक अडचणी या परिस्थितीस कारणीभूत आहेत.

लेखिका : मृण्मयी गावडे

संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *