श्वाानपुराण…आरोग्यविषयक दोन महत्त्वाचे प्रश्न

कुत्र्यासारखा इमानी पाळीव प्राणी आणि माणूस यांचे खूप जवळचे नाते आहे. अगदी देवांचा राजा इंद्र यानेही म्हणे श्‍वानाचा उपयोग पाळीव प्राणी असा करतानाच तो शत्रूचा माग काढू शकणारा हुशार प्राणी आहे असे मानले. इंद्राने आपल्या सैन्यातही एक श्‍वानपथक तयार केले होते! पुराणातील ही माहिती राज्यातील पोलिस डॉगस्क्वाड पाहणारे माजी निवृत्त अधिकारी अरविंद दायमा यांनी मला काही वर्षांपूर्वी सांगितली होती. आपल्या देवतांध्ये श्‍वानाचे महत्त्व श्रीदत्ताच्या पायांपाशी आहे. पण हा कुत्रा जसा इमानी व प्रेळ आहे, तसा तो हिंस्र आणि आक्रमकही होऊ शकतो.

इसवीसनपूर्व 2000 वर्षांपूर्वी माणूस व श्‍वान एकत्र असून त्यांनी एकमेकांना स्वीकारले होते. पुरातन कालातील चित्रे हा त्याचा पुरावा आहे. त्यानुसार त्यांनी एकमेकांचे, कुत्र्यांची घ्राणेंद्रिये तीव्र असते. वास घेण्याची क्षमता माणसापेक्षा अनेक पटीने तीव्र असतात. निसर्गात वास घेण्याच्या प्रक्रियेत ते मलमूत्र विसर्जनात आपले ठिकाणे निश्‍चित करतात. कुत्र्याचा हा गुण हेरूनच अनेक शेतकरी आणि मेंढपाळ शेत आणि मेंढ्या राखायला त्याचा वर्षानुवर्षे वापर करतानाही दिसतात. पण ही झाली श्‍वानाचा वापर करण्याची विधायक बाजू. नियंत्रणात नसलेले कुत्रे कुणावरही हल्ला करू शकते व चावूही शकते, ही पण या विषयाची दुसरी बाजू आहे. शिवाय पाळीव प्राणी किंवा भटकी कुत्री यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचे तसेच आरोग्याचेही निरनिराळे प्रश्‍न उद्भवतात ते वेगळेच. या दोन प्रश्‍नांवरच या लेखातून मी चर्चा करणार आहे.

मंगला गोडबोले यांच्यावरील श्‍वानहल्ला :

श्‍वानांचे हे प्रताप नुकतेच चर्चेला आले ते या नुकत्याच घडलेल्या घटनेुळे. प्रभातफेरीला बाहेर पडलेल्या ज्येष्ठ विनोदी लेखिका मंगला गोडबोले यांना 16 मे रोजी बुधवारी भल्या सकाळी सहा वाजता एका जीवघेण्या अनुभवातून जावे लागले. तेही शहरातील उच्चभ्रू वस्तीत असणार्‍या प्रभात रोड-भांडारकर रोड परिसरात. या भागातील तीन मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मंगलाताईंच्या डाव्या हाताचा पंजा एका कुत्र्याने फाडला, दुसर्‍याने उजव्या हाताची करंगळी चावली आणि तिसर्‍याने त्यांच्या दोन्ही मांड्या आणि पायांना अनेक ठिकाणी चावे घेतले. तिघा कुत्र्यांच्या एकाच वेळी झालेल्या हल्ल्यामुळे मंगलाताई गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर एका सहृदय परिचिताने मंगलाताईंना तेथून जवळ असणार्‍या जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल केले व तिथे त्यांच्या जखमांवर उपचार करण्यात आले. यासाठी अर्थातच 40 हजार रुपये खर्च आणि आठवडाभर वेदना एवढी किंमत मंगलाताईंना मोजावी लागली. यातूनच त्यांनी आपल्यावर अचानक झालेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यातून नागरी सुरक्षिततेचा महत्त्वाचा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. या हल्ल्यात आपण जमिनीवर पडलो असतो तर या कुत्र्यांनी आपल्या चेहर्‍याला तसेच डोळ्यांनाही इजा केली असती. आपल्याजागी जर कुणी लहान मूल किंवा कमी उंचीची महिला असती तर अघटित घडले असते. आपले दैव बलवत्तर म्हणूनच आपण केवळ वाचू शकलो, अशी सुटकेची भावना मंगलाताईंनी व्यक्त केली आहे.

यावर पुणे महापालिकेच्या लोकांनी मात्र नेहमीप्रमाणे हात वर केले असून प्राणीमात्रप्रेमी लोक यात अडथळा आणतात असे हुकमी कारण सांगून स्वत:ची सुटका करून घेतली. हे प्राणीप्रेमी आमच्या विरोधात थेट दिल्लीपर्यंत तक्रारी करून आमच्या नोकर्‍या धोक्यात आणतात, असेही न पटणारे कारण सांगितले. हताश झालेल्या मंगलाताई विचारतात की, प्राणीमित्रांना सामान्य माणसाबद्दल काहीच प्रे नाही का? कुत्रा चावल्यावर पुण्यासारख्या ठिकाणी रेबीजची इंजेक्शने मिळणार नसतील तर करायचे काय? मंगलाताई शेवटी विचारतात की, रस्त्यावर वाहने चालवली तर अनागोंदी वाहतुकीचे प्राणभय ओढवते, आणि रस्त्यांवर पायी चालले तर मोकाट कुत्र्यांपासून धोका उद्भवतो. माणसांनी या शहरात जगावे कसे?

मंगलातार्ईंच्या पाठोपाठ अवघ्या 12 दिवसांनी पुणे पोलिस आयुक्तालयात घुसलेल्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने पोलिस अधिकार्‍यासह चौघांचा चावा घेतला. या प्रकारात गुन्हेशाखेचे सहाय्यक निरीक्षक, दोन पोलिस कर्मचारी आणि जवळच्या शाळेच्या सुरक्षा रक्षकाला त्या कुत्र्याने जखमी केले. या घटनेनंतर त्या कुत्र्याला पकडून नेण्यात आले. विशेष म्हणजे चार दिवस हा कुत्रा आयुक्तालयात फिरत होता!

पुण्यातील प्राण्यांवर उपचार करणारे डॉ. सारंग लट्टू यासंबंधी बोलताना म्हणाले की, लेखिका गोडबोले यांच्यावरील प्रसंग दुर्दैवी आहे. हल्ला करणारी कुत्री ही या काळात माजावर आलेली असतात त्यातून हे घडले असावे. पिसाळलेल्या कुत्र्याकडून हे होण्याची शक्यता कमी वाटते, कारण अशी कुत्री त्यांच्या समूहातून आपोआप बाहेर काढली जातात. तसेच ती फार जगतही नाहीत. बरेच वेळा भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करण्यासाठी महापालिकेला जी मदत होते ती पुण्यातील प्राणीप्रेी संघटनांकडूनच होते. त्यातून अशा कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. हे काम पुणे महापालिकेने अधिक व्यापक स्वरूपात व परिणामकारक पद्धतीने करायला हवे.

श्‍वानांचे माणसांवरील हल्ले याबाबत आता प्राणीप्रेमी संघटनांनीच पुढाकार घेऊन श्‍वानदंशाचे प्रकार कमी व्हावेत म्हणून नागरिकांच्या ठीकठिकाणी कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. यातून अंगावर येणार्‍या कुत्र्यापासून कसे संरक्षण करता येईल याचे आपोआप प्रशिक्षण मिळेल. तसेच श्‍वानदंशामुळे होणारे नुकसानही टाळता येईल. विशेषत: रात्रीच्या वेळी शहरातील अनेक भागात झुंडीने कुत्री मागे लागतात. अशा वेळी त्या भागातून रोज जावे लागणार्‍या माणसाने घाबरून न जाता प्रसंगी त्या कुत्र्यांशी मैत्री कशी होईल हे पाहिले तर त्यातून हल्ले होण्याचे प्रश्‍नही आपोआप सोडवता येईल. अशा कुत्र्यांना अगदी एकदा तरी बिस्कीट किंव शिळी पोळी दिली तरीही ते प्राणी पुन्हा त्या व्यक्तीच्या वाट्याला जात नाही, अशी एक टीप डॉ. लट्टू यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्याचे प्रश्‍न :

पुणे शहरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढत्या श्‍वानसंख्येुळेही सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍न अधिकधिक बिकट बनत चालले आहेत. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्याही आता लाखांपर्यंत पोचली असून पाळीव कुत्री किमान 50 हजारांपर्यंत गेली असावी असा अंदाज डॉ. लट्टू यांनी व्यक्त केला आहे. या सार्‍याच कुत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांनी केलेली घाण पाहता हा प्रश्‍न आता अधिक उग्र स्वरूप धारण करण्यापूर्वीच तो सोडवला गेला पाहिजे. सकाळच्या प्रसन्न वातावरणात मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍या व्यायामप्रेी पुणेकरांना तर वाटेत मध्येच कुत्र्याने केलेली विष्ठा पाहून किळस वाटल्याशिवाय राहात नाही. समोरची घाण नाक दाबून सहन करणे हेही आता नित्याचेच झाले आहे!

पुण्यातील दुसर्‍या पॉश लोकेशनमध्ये राहणार्‍या उषा मेनन, श्यामला देसाई, ज्योती देशपांडे आणि धनंजय करमरकर या नागरिकांनी या श्‍वानप्रेबाबत नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, रस्त्यावर अनेक तरुण-तरुणी मोठमोठी कुत्री घेऊन येतात. हे प्राणी रस्त्यावर घाण करतात. कुत्र्याच्या मालकाच्या कानावर हा प्रकार घातल्यास तो याकडे दुर्लक्ष करतो. वास्तविक सार्वजनिक स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हल्ली प्राणीप्रेाच्या नावाखाली पाळीव प्राणी रस्त्यावर जी अस्वच्छता करीत आहेत, त्याला लगाम घालायची वेळ आली आहे. श्‍वानप्रेमीनागरिक त्यांच्या पाळीव प्राण्याला मोठ्या कौतुकाने रस्त्यावर फिरायला नेतात आणि सर्वांसमोर तो कुत्रा रस्त्याच्या मध्येच घाण करता या गोष्टीचे त्या कुत्र्याच्या मालकाला काहीच वाटत नाही. उलट त्या श्‍वानाचे कौतुकच वाटते!

श्‍वानप्रेमी माणसाची ही मानसिकता तर कुत्र्याच्या घाणीमुळे इतरांची होणारी कुचंबणा वाढत चालली आहे. कर्वेनगर भागातील एक आघाडीचे डॉक्टर यांनी या फाजिल श्‍वानप्रेाला त्यांच्या पद्धतीने उत्तरही दिले आहे. तुचे श्‍वानप्रे माझ्या दारात घाण करण्यासाठी नाही. डॉक्टरांच्या बंगल्याच्या दारात रोज घाण करणार्‍या एका पाळीव कुत्र्याला व त्याच्या मालकाला त्यांनी हेरले. कुत्र्याची ती घाण उचलून कुत्र्याच्या मालकाच्या दारात ठेवली, हे सतत केल्यामुळे त्या कुत्र्याला व त्याच्या मालकाला चांगला धडा मिळाला, असे या डॉक्टरांना वाटले. पण या कुत्र्याला पुन्हा आणखी तिसर्‍याच्या दारात घाण करायची सवय लागली! त्यामुळे कुत्र्याच्या मालकाच्या दारात ती घाण टाकून हा प्रश्‍न सुटत नाही. त्यासाठी काही ठोस पावले उचलून तसा कायदा करणे भाग आहे.

श्‍वान विष्ठेचा हा त्रास केवळ सार्वजनिक रस्त्यांवर असतो असे नाही, तर खासगी हाऊसिंग सोसायट्यांध्येही अनुभवायला येतो. एका सोसायटीच्या सिक्युरिटीने सांगितले की हा प्रश्‍न आता काही श्‍वानप्रेींचा इगोप्रश्‍न बनला आहे. सुरक्षा रक्षकांच्या जवळच एक महिला तिच्या लाडक्या श्‍वानाला घेऊन फिरायला आली. ते श्‍वान त्या सुरक्षा रक्षकाच्या शेजारीच घाण करू लागले तेव्हा तो रक्षक वैतागला. म्हणाला, बाई तुम्ही किमान तुच्या कुत्र्याला थोडे लांब न्या. त्यावर त्या बाई तोर्‍यात म्हणाल्या, आम्ही इथे मेंटेनन्स चार्ज भरतो! याचा अर्थ श्‍वानांच्या मालकांचे प्रबोधन हीच आजची खरी गरज आहे.

रस्त्यावरील कुत्र्यांच्या विष्ठेचा त्रास हा आता मोठा उग्र प्रश्‍न होण्यापूर्वीच तो सोडवला गेला पाहिजे, असे डॉ. लट्टू यांना वाटते. ते म्हणाले की, महापालिकेनेच आता पुढाकार घेऊन किमान पाळलेल्या कुत्र्यांची घाण त्यांच्या मालकांनीच काढावी असा नियम केला पाहिजे. परदेशात याबाबत कडक निर्बंध व कायदे केले आहेत. आपल्याकडे हे करणे व त्याची अंलबजावणी करणे शक्य आहे. ते लवकरात लवकर करावे. तसेच कुत्र्यांची विष्ठा कुठे टाकावी याचीही स्वतंत्र यंत्रणा महापालिकेनेच उभारायला हवी. सध्या कुत्र्यांची घाण काढायला महापालिकेचे सफाई कर्मचारी तयार नसतात. त्यामुळे हा कचरा स्वतंत्र वेगळा काढून त्यापासून खतनिर्मिती करता येईल याबाबतच प्रकल्प महापालिकेने हाती घ्यायला हवा. याशिवाय सकाळी कुत्री फिरवायला नेणार्‍या मालकांना त्यांनी ती कुठे फिरवावीत यासाठी काही ठिकाणे नेमून द्यावीत.

कुत्र्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह!

यावर एक उत्तर पिंपरी-चिंचवडच्या एका पशुवैद्यकीय अधिकार्‍याने शोधले आहे. कुत्र्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह शक्य आहे ही कल्पना त्यातूनच पुढे आली. कुत्र्यांसाठी स्वच्छतागृहे नाव जरी गमतीदार वाटले तरी त्याची टिंगल करावी असे त्यात काही नाही. हा प्रयोग व त्यासाठी एक खास प्रस्तावही पुण्याशेजारील पिंपरी-चिंचवड महापालिकेत सादर करण्यात आला. हे काम ज्यांनी केले ते आहेत महापलिकेचे निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे! त्यांनी या विषयाचा गेली दहा वर्षे सातत्याने पाठपुरावा केला आहे. विशेषत: आजच्या स्वच्छ भारत मोहिमेत त्यांनी कुत्र्यांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहे ही कल्पक योजना हाती घेतली. त्यांनी पाठवलेला प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विचाराधीन आहे. वास्तविक, पुणे महापालिकेनेही याबाबत विचार करण्यासारखा आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने पाळीव कुत्र्यांच्या मालकांसाठी असून त्याच्या मालकांनी कुत्री फिरवताना या कुत्र्यांना अशा स्वच्छतागृहांध्येच मलमूत्र विसर्जन करण्याची सवय लावणे शक्य होईल.

श्‍वानांच्या स्वच्छतागृहाचे संकल्पनाकार डॉ. सतीश गोरे आणि आर्किटेक्ट विशाल रांका

यासंबंधी बोलताना डॉ. गोरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक परिसरातील पाच हजार पाळीव कुत्र्यांची माहिती आम्ही महापालिकेतून तसेच खासगी डॉक्टरांच्यामदतीने मिळवली. यातली बरीचशी कुत्री ही सकाळी आणि रात्री मलमूत्रविसर्जनासाठी त्यांचे मालक बाहेर नेतात. आपल्या सदनिकेतच या कुत्र्यांना राहाण्याची सवय असल्यामुळे किमान त्यांच्या नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी तरी त्यांना दररोज बाहेर फिरवून आणावे लागते हे सार्वत्रिक चित्र आहे. पण सार्वजनिक ठिकाणी रस्ते, फूटपाथ आणि बागांमध्ये चालण्याच्या वाटांच्या मधोध ही कुत्री घाण करतात हाही अनुभव सार्वत्रिक आहे. यातूनच सार्वजनिक जागा सातत्याने खराब होऊन मानवी आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो.

डॉ. गोरे म्हणाले की, बर्‍याचशा कुत्र्यांना दररोज ठराविक ठिकाणीच मलमूत्रविसर्जन करण्याची सवय लागलेली असते. मूत्रविसर्जनाच्या बाबतीत कुत्र्यांमध्ये ते दाबून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे जेव्हा त्यांना बाहेर नेले जाते तेव्हा ते अनेक ठिकाणील खांब वा उंचवटा असेल तर एक पाय वर करून मूत्रविसर्जन करताना दिसते. या गोष्टींचाही श्‍वान स्वच्छतागृहात विचार केला आहे. या मूत्रालाही उग्र दुर्गंध असून ते वेळीच साफ किंवा धुवून टाकणे गरजेचे असते. पण तसे घडताना दिसत नाही. याचा थेट परिणाम म्हणजे रस्ते, पादचारी मार्ग आणि सार्वजनिक बागा यामुळे दूषित होतात व तिथून चालणेही अवघड होऊन बसते. (सोबतचे छायाचित्र पाहावे.) विविध जातींच्या कुत्र्यांनी तसेच विविध वयोगटाच्या व वजनाच्या कुत्र्यांनी केलेली घाण ही साधारण 200 ते 600 गॅ्र वजनाइतकी असते. तीविष्ठा किती उपद्रव देणारी असते! वास्तविक ही सर्वविष्ठा व घाण एकत्र केली तर ती किती मोठी आहे याची कल्पना येते.

यावर नियंत्रण ठेवण्यासाठीच कुत्र्यांच्या स्वच्छतागृहाचा प्रकल्प तयार केल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, यातून सार्वजनिक मानवी आरोग्य अबाधित ठेवून कुत्र्यांची विष्ठा व घाण एकत्रित करणे शक्य होईल. यातूनच सार्वजनिक ठिकाणी पाळलेल्या कुत्र्यांसाठी स्वच्छतागृहे हा एक परिणामकारक मार्ग ठरेल. तसेच आपल्या पाळलेल्या कुत्र्याला कुठेही घाण करू देण्याची प्रवृत्ती नियंत्रणात येईल. यातून सकाळच्या प्रसन्न वेळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडणार्‍या नागरिकांनाही दररोज होणार्‍या  श्‍वानविष्ठेचा त्रास सहन करावा लागणार नाही.

वैद्यकीय दृष्टीनेही काहींना श्‍वानविष्ठेची अ‍ॅलर्जी असते. पिंपरी-चिंचवडचा विचार करून डॉ. गोरे यांनी रस्त्याच्या कडेला पादचारी मार्गाला, महापालिकेच्या उद्यानाला लागून तसेच महापालिका मोकळ्या जागेला लागून योग्य प्रकारची सीमाभिंत घालून त्या पलीकडे श्‍वान स्वच्छतागृहांची रचना केली आहे.

डॉ. सतीश गोरे यांनी तयार केलेल्या श्‍वानांच्या स्वच्छतागृहाचे संकल्पचित्र. रेखाचित्र आर्किटेक्ट विशाल रांका यांचे आहे.

तिथे खड्डे खणून तिथे या प्राण्यांना मलमूत्रविसर्जन करता येईल अशीही व्यवस्था केली आहे. मोकळी हवा असल्यामुळे याचा संसर्ग आसपासच्या पादचारी व इतर लोकांना होणार नाही, याचीही खबरदारी त्यात घेण्यात आली आहे. याठिकाणी विशिष्ट प्रकारची माती, वाळू, भुसा, कोळशाची भुकटी, खडी, चुना याचा वापर करून त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणे अधिक सोयीचे ठरेल. शिवाय ते एकाच ठिकाणी संकलित होत असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने ती महत्त्वाची बाब ठरेल. यातून मनुष्यबळही वाचवता येईल, असेही डॉ. गोरे यांचे म्हणणे आहे.

एकदा का आपल्या लाडक्या टॉमीला या स्वच्छतागृहाची सवय लागली की तो रोज याच ठिकाणी येऊन त्याचे नैसर्गिक विधी पार पाडील. हे पाहून टॉमीची नक्कल इतर पाळलेल्या कुत्र्यांपैकी टिपू किंवा चंपी करतील! आपल्या प्रस्तावात डॉ. गोरे यांनी एकीकडून दुसरीकडे हलवता येईल अशा मोबाईल टॉयलेटचीही कल्पना सुचवली आहे.

त्यामध्ये घडी घालता येतील किंवा तातडीने जोडून तयार करता येतील असे स्वच्छता गृहाचे मॉडेलच त्यांनी तयार केले आहे. यामुळे रस्त्याजवळील हिरवाई व हिरवळ स्वच्छ राहील, तसेच हलक्या वजनाच्या या मोबाईल टॉयलेटला कुठेही चटकन हलवता येईल वा त्याची सहज वाहतूकही करता येईल. पर्यावरणपूरक असलेले हे स्वच्छतागृह साफ करायलाही सोपे व कमीत कमी वेळ घेणारे आहे.

यामध्ये कोणताही वास नसणारी कृत्रिम हिरवळही बसवता येते. डॉ. गोरे म्हणाले की, शहरात ज्या ठिकाणी पाळीव कुत्र्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे अशा जागी हा प्रकल्प राबवणे अधिक सोयीचे ठरेल. पथदर्शी प्रकल्प म्हणून आधी तो अशाच एखाद्या वॉर्डमध्ये सुरू करून त्याचे परिणाम व वापर याचा अंदाज घेता येईल. यातील व्यावहारिक अडचणी सोडवल्यास तो इतर वॉर्डस्ध्येही हळुहळू वापरायला घेता येईल. कुत्र्यांसाठी तयार करण्यात येणार्‍या या विशेष स्वच्छता गृहांची रचना व त्यांचे डिझाईन ही एक खास गोष्ट आहे. याबाबतीत पिंपरी चिंचवडमधील आर्किटेक्ट विशाल रांका यांनी पुढाकार घेऊन डिझाईनमधील तांत्रिक गोष्टी निश्‍चित केल्या.

विशेष म्हणजे या स्वच्छतागृहाचा अन्य कोणत्याही कारणासाठी वापर केला जाता कामा नये. तसेच या ठिकाणी कुत्र्यांध्ये भांडणे किवा मारामार्‍या होणार नाही, याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. शेवटी ज्यांच्यासाठी ही स्वच्छतागृहे आहेत तो हेतू साध्य झाला तर आपले पर्यावरणही स्वच्छ आणि निरोगी राहायला मदत होईल. यासाठी समाजात सर्वत्र सकारात्मक दृष्टिकोन तसेच पाळीव कुत्र्यांच्या मालकांचे संपूर्ण सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे डॉ. गोरे यांनी स्पष्ट केले.

कुत्र्यांची स्वच्छतागृहे उभारण्यापूर्वी आपल्या शहरात, प्रत्येक वॉर्डात पाळीव कुत्र्यांची तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या किती आहे यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. त्या आधारे ही योजना कशा पद्धतीने राबवायची याची धोरणात्मक बाब ठरवता येईल. होईल. डॉ. गोरे पुढे म्हणाले की, ज्यावेळी अशा कुत्र्यांसाठी प्रत्यक्ष स्वच्छतागृहे उभारण्याची वेळ येईल त्यापूर्वी त्या त्या भागातील भटकी कुत्री व त्यांचा वावर असणारी त्यांची हद्द यांचा विचारही श्‍वानप्रेमी संघटनांच्या मदतीने केला गेला पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन करणे शक्य होईल. या योजनेचे महत्त्व कुत्री पाळणार्‍या मालकांना व्यवस्थित समजावून सांगितले तर ते याचा प्रत्यक्ष आवलंब करू शकतील. तसेच ही योजना राबवायला सुरुवात केल्यावर काही कुत्र्यांना त्याचा वापर करायला शिकवून किंवा तसे प्रशिक्षण दिले पाहिजे. यातूनच पुढे त्याचा थेट उपयोग इतर कुत्र्यांनी करण्यासाठी याचा अधिक प्रभावी पद्धतीने वापर करता येऊ शकेल. या विशेष स्वच्छतागृहांची उभारणी करताना त्यातील घाण आपोआप स्वच्छ करता येईल हा त्यातला महत्त्वाचा भाग कशा पद्धतीने होतो आहे याकडे विशेष कटाक्ष ठेवावा लागेल. या योजनेतील पाळीव कुत्रा व त्याचा मालक या दोघांनाही तिथे व्यवस्थित वावर करता येईल याचीही काळजी सुरुवातीपासूनच घ्यायला हवी.

डॉ. गोरे यासंबंधी म्हणाले की यातील तांत्रिक गोष्टी लक्षात घेता महापालिकांनी ती योजना त्यातील तज्ज्ञांच्या मदतीनेच योग्य पद्धतीने अमलात आणायला हवी. यासाठी अर्थातच राजकीय इच्छाशक्ती हवी. महापालिकेच्या सभांमधून यासंबंधीचा ठराव राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पद्धतशीरपणे संत करून घ्यायला हवा. त्यामुळे त्याच्या अंलबजाणीस कोणीही विरोध करणार नाही. या उपक्रमातून महापालिकेला कुत्र्यांच्या परवानाशुल्कात वाढ करता येईल व ही स्वच्छतागृहे वापरणार्‍यांकडून काही किमान शुल्कही आकारता येईल. अर्थात या योजनेसाठी जमीन देणार्‍यांना त्यातून सूट देता येईल अशीही तरतूद केली जावी, अशी अपेक्षा डॉ. गोरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्याच्या स्वच्छ भारत योजनेत कुत्र्यांसाठी लागणार्‍या या विशेष स्वच्छतागृहामुळे त्याचा लाभ अनेकांना घेता येईल.

डॉ. गोरे व त्यांच्या सहकार्‍यांनी तयार केलेली ही योजना आजची खरी गरज आहे. ती प्रत्यक्ष राबवताना व त्याच्या यशापयशाची चर्चा करण्यापूर्वी तो पथदर्शी प्रकल्प म्हणून काही ठिकाणी खासगी पातळीवर राबवून पाहायला हरकत नाही. यात अनेक तांत्रिक गोष्टींचा समावेश आहे. महापालिका, पाळीव कुत्र्यांचे मालक, श्‍वानप्रेमी संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून तो अधिकाधिक यशस्वी होण्याची शक्यता आहे. कोणताही नवीन उपक्रम असला तर त्याचे रिझल्ट्स् यायला वाट पाहावी लागते. सुरुवातीला पाळीव कुत्र्यांना याची सवय लागण्यासाठी वाट पाहावी लागेल. त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. हा एक प्रयोग असल्यामुळे तो कशा पद्धतीने राबवला जातो याकडे नागरिकांनीही चेष्टा न करता त्यात सहभागी व्हायला हवे. त्याचीउपयुक्तता जर खरेच होणार असेल, तर अशा प्रयत्नांकडे गांभीर्यानेच पाहायला हवे. आरंभशूरपणा इथे कामाचा नाही!

महापालिकेच्या नोकरीतून काही सर्जनशील व समाजोपयोयागी काम करणार्‍या डॉ. सतीश गोरे, तसेच आर्किटेक्ट विशाल रांका व त्यांच्या सहकार्‍यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

– श्री. विवेक सबनीस 

संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *