सरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, 24 एप्रिल :  मिशन मोडमधील महाराष्ट्राला विकासाची दिशा देण्याचे काम गेल्या साडेतीन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील  सरकारने केले आहे. हे परिवर्तन घडवितानाच प्रामाणिकता, निष्कलंक आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची इतिहास नोंद घेईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्‍्‍त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’  या पुस्तकाचे प्रकाशन सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. या प्रकाशन सोहळ्यात श्री. गडकरी बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे होते.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत जे काम केले आहे, त्या वस्तुस्थितीचे विश्लेषण  लेखक चांदोरकर यांनी या पुस्तकात केले आहे. या सरकारने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात अजोड अशी कामगिरी केली आहे. नुकत्याच केलेल्या मराठवाड्यासह विदर्भाच्या दौऱ्यात सरकारच्या या कामाची चुणूक दिसून आली. यापूर्वी लागणाऱ्या टँकर्सची संख्यात लक्षणीयरित्या घट झाली आहे. गेली वीस वर्षे राज्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडले होते. या प्रकल्पांमुळे भांडवली गुंतवणूकही मृत झाल्यातच जमा होती. असे हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या सरकारने पाठपुरावा सुरू केला. यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विशेषत्त्वाने लक्ष पुरविले. यामुळे रखडलेले हे 108 प्रकल्प मार्गी लागले आहेत. यातील साठ टक्‍्‍के प्रकल्प येत्या जूनपर्यंत पूर्ण होतील, अशा टप्प्यांवर पोहोचले आहेत. यामुळे राज्यातील सिंचनाखालील क्षेत्राची टक्‍्‍केवारी 18 वरून 40 टक्क्यांवर पोहोचेल. याचा लाभ पिण्याच्या  ण्याबरोबरच शेतीला होणार असल्याने, आत्महत्याग्रस्त भागालाही दिलासा मिळणार आहे. राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना प्राधान्याने वीजजोडण्या देण्याचे उल्लेखनीय कामही सरकारने केल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात मोठे बदल होत आहेत. पायाभूत सुविधा, औद्योगिक क्षेत्र, त्यासाठी येणारी गुंतवणूक, त्यातून निर्माण होणारे रोजगार यामुळे महाराष्ट्राची प्रतिमाही बदलते आहे. आरोग्य, वैद्यकीय सुविधा, आदिवासी-वनवासी यांच्यासाठीचे काम, मुंबई या शहराला कमर्शियल कॅपिटल बनविण्यासाठीचे प्रयत्न, अशा सर्व प्रयत्नांमुळे महाराष्ट्र मिशन मोड पद्धतीने वाटचाल करू लागला आहे. यातून फडणवीस सरकारने स्वच्छ, पारदर्शक प्रशासन आणि निर्णय घेणारे सरकार अशी प्रतिमा निर्माण केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील जलयुक्‍्‍त शिवार प्रकल्पासह, विविध सिंचन प्रकल्प, समृद्धी महामार्ग अशा प्रकल्पांचा आवर्जून उल्लेखही केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हे पुस्तक आत्मचरित्र नाही, गौरवगान नाही. तर गेल्या तीनसाडे तीन वर्षांतील उल्लेखनीय कामांचे, योजना, निर्णयांचे आणि परिणामांचे संकलन आहे. हे मि शन माझ्या एकट्याचे नाही. तर माझ्या टीममुळे महाराष्ट्रात जे परिवर्तन घडवू शकलो, त्या परिवर्तनाची गाथा म्हणजे हे पुस्तक आहे. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात राज्यात परिवर्तनशील अशा अनेक योजना राबविल्या, त्याचा धावता आढावा या पुस्तकात आहे. राज्याच्या विकासासाठी हे मिशन हाती घेताना पारदर्शकता आणि सकारात्मकता हे सूत्र ठेवले. लोकांच्या समस्या सोडविताना, जे त्यांना मान्य आहेत असे निर्णय घेतले. त्यामध्ये श्रेयवाद कधीही आणला नाही. यामुळे वेगवेगळ्या समुदाय,  तकर्‍यांकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जनहिताकरिता निर्णय घेतला की, त्याच्या परिणामांची चिंता करू नये, हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेले तत्त्व कसोशीने पाळले. त्यांच्या प्रेरणेतूनच राज्यात रखडलेले, गेली कित्येक वर्षे चर्चे त असलेले शंभर प्रकल्प कार्यान्वित केल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलयुक्‍्‍त शिवारसारखी योजना आता लोकचळवळ बनली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मिशन मोडमधील योजना आता ऑटो मोडवर कार्यान्वित झाल्या आहेत. जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्रातील दुष्काळ इतिहास जमा होईल, असा विश्‍वास वाटू लागला आहे. आरोग्यासह अनेक क्षेत्रात सरकारने अनेक महत्त्वपूर्ण आणि लोकांच्या हितांचे निर्णय घेतले आहेत. त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्याचे पाहून अनेकदा मोठे समाधान वाटते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा नेतृत्त्व म्हणून मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पण ते देतानाच हे पद महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे, याची जाणीव करून दिली होती. महाराष्ट्रातील जनतेत मोठी ताकद असल्याचे, त्यांनी त्यावेळी नमूद केले होते. त्यामुळे यापुढेही सकारात्मकता आणि पारदर्शकता यातूनच महाराष्ट्र हे सक्षम आणि समृद्ध राज्य बनेल असा  विश्‍वास वाटतो. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील पायाभूत विकासांच्या विविध प्रकल्पांचाही उल्लेख केला. तसेच उद्योजक आनंद महिंद्र यांच्यासह देश आणि विदेशातील संस्था, संघटनांना महाराष्ट्राला प्रगतशील राज्य म्हणून मानांकने दिल्याचा उल्लेखही केला. प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. मोरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव येत्या काही वर्षांत साजरा होईल. त्या पार्श्‍वभूमीवर हे पुस्तक महत्त्वाचे आहे. देवराष्ट्रे या गावातून आलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी या राज्याची स्थापना केली. त्यामुळे देवराष्ट्रे ते देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राचा प्रवास महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या सरकारने जी कामे केली, ती लोकांपर्यंत पोहोचली की नाही याचा धांडोळा या पुस्तकात आहे. विशेषतः यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेचा उल्लेखही अनेकदा आहे. ही प्रतिमा टिकविण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही, हे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या कामातूनही दाखविले आहे. काम करणारे मुख्यमंत्री म्हणून श्री. फडणवीस यांनी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राला अशाच तरुण नेतृत्वाची गरज होती. मुख्यमंत्री श्री. फडणवीस ती समर्थपणे जबाबदारी सांभाळत आहेत. राज्याला योग्य वेळी, योग्य मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या रूपाने मिळाल्याचेही डॉ. मोरे यांनी नमूद केले.

सुरुवातीला लेखक श्री. चांदोरकर यांनी प्रास्ताविकात पुस्तकाचा लेखन प्रवास उलगडला. ते म्हणाले, राज्यातील पंचवीस जिल्ह्यांत दौरा केला. सामान्य नागरिक आणि योजनांचे लाभार्थी यांच्याकडून प्रतिक्रिया घेतल्या. जलयुक्त शिवारसारख्या योजनांत सहभागी झालेल्यांशी संवाद साधला. अनेक प्रयोगशील उपक्रमांची पाहणी केली. सरकारी योजनांचा कसा लाभ झाला, याच्या सुमारे पस्तीस यशकथा या पुस्तकात समाविष्ट आहेत. माध्यमातील, समाजमाध्यमातील चर्चेच्या पलिकडे जाऊन राज्यात अनेक चांगल्या गोष्टी घडताहेत हे वेगळे चित्र दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *