इंग्रजी साहित्याचा बादशहा – शेक्सपियर

शेक्सपियरच्या इंग्रजी साहित्यातील योगदानाला तोडच नाही असे संपूर्ण साहित्य विश्‍वामध्ये मानले जाते. शेक्सपियरने एकूण 38 नाटके, 154 सॉनेट्स् (14 चरणांची कविता) आणि 2 कवितारूपी गोष्टी लिहिल्या. शेक्सपियरच्या प्रत्येक साहित्यकृतीमधून मानवी भावनांचा आविष्कार पहायला मिळतो. नात्यांची गुंतागुंत, प्रेाची शोककथा तर पराक्रमी वीरगाथा अशा विविध टोकाच्या भूमिकांची सरमिसळ शेक्सपियरच्या प्रत्येक साहित्यकृतीतून दिसून येते. शेक्सपियर केवळ लेखकच नव्हता तर उत्तम अभिनेता सुद्धा होता.

‘‘माणूस त्याला सगळ्यात जास्त कळला.’’ असे ज्याच्या बाबतीत म्हटले जाते, ज्याने इंग्रजी साहित्यामध्ये बहुूल्य असे योगदान दिले, ज्याने स्वतःच्या प्रतिभेने मानवी भावनांच्या प्रत्येक अविष्काराला हात घातला आणि इंग्लंडने ज्याला ‘राष्ट्रीय कवी’ आणि ‘बार्ड ऑफ अ‍ॅव्हॉन’ म्हणून किताब दिला, ते इंग्रजी साहित्याचा बादशहा म्हणजेच विल्यम शेक्सपियर. 23 एप्रिल 1616 रोजी जगाचा निरोप घेतलेल्या या लेखकाला जाऊन 399 वर्षे पूर्ण होतील. शेक्सपियरच्या इंग्रजी साहित्यातील योगदानाला तोडच नाही असे संपूर्ण साहित्य विश्‍वामध्ये मानले जाते. शेक्सपियरने एकूण 38 नाटके, 154 सॉनेट्स् (14 चरणांची कविता) आणि 2 कवितारूपी गोष्टी लिहिल्या. शेक्सपियरच्या प्रत्येक सहित्यकृतीमधून मानवी भावनांचा आविष्कार पहायला मिळतो.

नात्यांची गुंतागुंत, प्रेाची शोककथा तर पराक्रमी वीरगाथा अशा विविध टोकाच्या भूमिकांची सरमिसळ शेक्सपियरच्या प्रत्येक साहित्यकृतीतून दिसून येते. शेक्सपियर केवळ लेखकच नव्हता तर उत्तम अभिनेता सुद्धा होता.

साधारणतः 1589 ते 1623 मध्ये शेक्सपियरने त्याच्या मुख्य कलाकृतींची निर्मिती केली. शेक्सपियरच्या पहिल्या काही नाटकांध्ये विनोदी आणि ऐतिहासिक नाटकांचा सुद्धा समावेश होता. परंतु नंतर शेक्सपियरच्या लिखाणामध्ये शोकांतिकांचा प्रभाव दिसून येऊ लागला. हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लीअर आणि मॅक्बेथ या शेक्सपियरच्या गाजलेल्या चार शोकांतिका. शेक्सपियरच्या ‘हम्लेट’वरच आधारित ‘हैदर’ या चित्रपटाची निर्मिती विशाल भारद्वाज यांनी केली. म्हणजेच शेक्सपियरच्या साहित्याचा प्रभाव हा सातासमुद्रापार सुद्धा पसरलेला आहे.

‘”All the World’s a stage.

and all the men and women

merely players.

they have their exits and their entries.

and one man in his time

plays many parts..”

– As you like it, Act II, Scene 7.

शेक्सपियरच्या वरील वाक्यामधूनच त्याची मानवी आयुष्यासंबंधीची प्रेरणा कळून येते. प्रत्येक वेळी मानवाला जीवनपटावर विविध भूमिका कराव्या लागतात हे शेक्सपियरला इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातच लक्षात आले होते. हॅम्लेटनंतर तर शेक्सपियरने त्याच्या प्रत्येक कवितेची रचना ही भावनिक आणि शोकांतिका पद्धतीचीच सुरुवात केली. प्लूतार्च आणि हॉलिनशेड या अशाच दोन प्रकारच्या गोष्टींना शेक्सपियरने नाटकाचे स्वरूप दिले.

शेक्सपियरने लिहिलेल्या नाटकांध्ये त्याने वापरलेल्या शब्दांची संख्या आहे 9,36,433. म्हणजेच जवळपास साडेनऊ लाख शब्द. या साडेनऊ लाख शब्दांपैकी 27,870 शब्द हे खूप वेगळे शब्द आहेत. शेक्सपियरचा शब्दसाठा सध्याच्या इंग्रजी शब्दसाठ्यापैकी 40% साठा दर्शवितो. सामान्य माणसाची क्षमता केवळ 2000-3000 शब्दसाठंयापर्यंतच मर्यादित असते. शेक्सपियरने एकूण 1,700 नवीन शब्दांची भर इंग्रजी भाषेध्ये घातली.

प्रचंड शब्दसाठा आणि मानवी नात्यांधील गुंफण ओळखण्यामध्ये कौशल्य या दोन गुणामुळे शेक्सपियर साहित्य क्षेत्रामध्ये ही उंची गाठू शकला. शेक्सपीयरच्या कवितांध्ये त्याने इंग्रजी भाषेधील प्रत्येक अलंकार वापरला आहे. शेक्सपियरने त्याच्या प्रत्येक पात्रामध्ये आशावाद, इच्छाशक्ती, दुःख, आनंद, प्रे, मत्सर या भावभावनांचा प्रभाव कुठे ना कुठेतरी दाखवलाच. शेक्सपियरच्या साहित्यकृतींमधील मुख्य तीन साहित्यकृती पुढीलप्रमाणे.

1) हॅम्लेट – हॅम्लेटची शोकांतिका अर्थात , डेन्मार्कचा राजकुमार’’ असे या नाटकाचे नाव आहे. याच नाटकाला ‘हॅम्लेट’ म्हणून सर्वत्र ओळखले जाते. शेक्सपियरने ही शोकांतिका 1599 ते 1602 मध्ये लिहिली. डेन्मार्क मधले वर्णन असलेली ही शोकांतिका राजकुमार हॅम्लेटच्या आयुष्यावर आधारित आहे. हॅम्लेट ही शेक्सपियरची सर्वात मोठी आणि मानवी विचारांवर प्रचंड प्रभाव पाडणारी शोकांतिका आहे. रॉयल शेक्सपियर्स अ‍ॅकॅडमीमध्ये सर्वांत जास्त वेळा या शोकांतिकेचा खेळ झालेला आहे.

2) रोमिओ -ज्यूलिएट –

रोमिओ-ज्यूलिएट ही शेक्सपियरने लिहिलेली प्रेाची शोकांतिका आहे. ऐन तारुण्यात असलेले दोन समाजाच्या सर्व सीमा तोडून मृत्यूची गळाभेट घेतात. हॅम्लेटच्या तोडीची ही शोकांतिका रोन साम्राज्याच्या पार्श्‍वभूीवर आधारलेली आहे. शेक्सपियरने ही शोकांतिका ‘‘द ट्रॅजिकल हिस्ट्री ऑफ रोमिओ ज्यूलिएट’’ या आर्थर ब्रुक यांनी लिहिलेल्या कथेच्या आधारावर घेतली आहे.

3) ज्यूलिअस-सीझर –

ट्रॅजेडी ऑफ ज्यूलिएस सीझर ही शोकांतिका शेक्सपियरने 1599 च्या दरम्यान लिहिली. शेक्सपियरने लिहिलेली ही शोकांतिका रोन साम्राज्यातील खर्‍या घटनेवर आधारित आहे. शेक्सपियरचे हे नाटक सन्मान, देशभक्ती आणि मैत्री यांच्या गुंफणीवर आधारित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *