21 वे शतक भारताचे (माझे सर्वांना सस्नेह निमंत्रण)

प्रथम, मधे, शेवटी आणि कायमच सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा.

आणि त्यासोबत, सर्वांना निमंत्रण, सस्नेह. आग्रहाचं आणि माझं वैयक्तिक सुद्धा.

‘21 वे शतक भारताचे’ – ही मध्यवर्ती कल्पना – म्हणून तसं शीर्षक ठेवून, आता 6 + 2 अशी 8 भागांची मालिका आयोजित करत आहोत.

17 जानेवारी 2018 भारत – चीन संघर्ष
18 जानेवारी 2018 पर्यावरण : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर
5 फेब्रुवारी 2018 जागतिकीकरण : घड्याळाचे उलटे काटे
13 फेब्रुवारी 2018 अणुविज्ञान : विध्वंस की ऊर्जानिर्मिती
15 फेब्रुवारी 2018 जय जय हे महिषासुरमर्दिनी
20 फेब्रुवारी 2018 विज्ञान आणि अध्यात्माचे अद्वैत

 

स्थळ : गणेश कला क्रीडा सभागृह

वेळ : सायंकाळी 6 ते 8

 

1

‘संकल्प दिवस’’

7 वा भाग म्हणजे चाणक्य मंडल परिवारचा ‘संकल्प दिवस’. चाणक्य मंडल परिवारच्या शैक्षणिक वर्षातला महत्त्वाचा दिवस – असेल, 26 फेब्रुवारी रोजी – म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 52 व्या पुण्यस्मरण दिवशी.

ज्यानं आपल्या वयाच्या 16 व्या वर्षी, स्वतःच्या आयुष्याचासंकल्प’ सोडला –

मायभूीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ –

आणि पुढची आयुष्याची 68 वर्षे एका पेटलेल्या यज्ञाप्रमाणे जे धगधगत राहिलं, सशस्त्र क्रांती, काव्य-कथा-कादंबरी-नाटक असा साहित्याच्या सर्व ‘र्फॉ’ मधे असामान्य प्रतिभावंत संचार केला.

इतिहास लेखनाचे नवे आदर्श उभे केले.

 जाती व्यवस्था समूळ संपवून समतापूर्ण, विज्ञाननिष्ठा समाजाचं स्वप्न पाहिलं –

‘‘गुणसुने मी वेचियली या भावे

की तिने सुगंधा घ्यावे

जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा

हा व्यर्थ भार विद्येचा’

अशा ओळी लिहिल्या.

आणि आपल्या जीवनात जगून दाखवल्या…,

जे तिन्ही भाऊ मातृभूीच्या चरणी अर्पण झाले, घरदार उद्ध्वस्त झालं, तरी जे म्हणाले – ‘हे काय बंधु असतो जरि आम्ही सात त्वत्स्थंडिलावरी…’

ज्यांनी जीवनाच्या सर्व अंगांधे मुक्त, प्रतिभावंत संचार केला, आणि म्हणाले –

‘‘हे मातृभूी तुजला मन वाहियेले

वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले

तू तेची अर्पिली कविता रसाला

लेखाप्रती विषय अनन्य तूचि झाला’

अशा मृत्युंजय सावरकरांच्या 52 व्या पुण्यस्मरणदिनी चाणक्य मंडल परिवारचे युवक ‘संकल्प’ सोडतील – आपलं व्यक्तिमत्त्व आणि करियरमध्ये ‘उत्तमता आणि प्रतिभा’ साध्य करून ‘लोकसेवा’ करण्याचा संकल्प.

 त्यांच्या या संकल्पाला बळ द्यायला, मार्गदर्शन करायला, आशीर्वाद द्यायला पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव येणार आहेत. आणि ते ‘भारत आणि जगाची आर्थिक धोरणे’ यावर बोलणार आहेत.

तुम्हीही सर्वजण या.

असा संकल्प सोडण्यापूर्वी 6 भागांची मालिका आहे, ‘21 वे शतक भारताचे’’ या या मध्यवर्ती संकल्पनेभोवती, स्वप्नाभोवती आखलेली. असे ‘21 वे शतक भारताचे’ करण्यासाठी सुद्धा, सर्वजण या.

॥ 2 ॥

प्रतिभावंतांची मांदियाळी

26 फेब्रुवारीच्या ‘‘संकल्प’ दिवसा’च्या दुसर्‍या दिवशी, 27 फेब्रुवारीला आणखी एक – अत्यंत विशेष – First of its Kind – असा कार्यक्रम आयोजित करत आहोत. चाणक्य मंडल परिवारच्या शैक्षणिक कामाचं हे 22 वं वर्ष चालू आहे. पूर्ण झालेल्या 21 वर्षात चाणक्य मंडल मधून महाराष्ट्र, भारत आणि जगभरसुद्धा अनेक प्रतिभावंत प्रशासनात उत्तम कामगिरी करतायत. स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन चालवून ‘कार्यकर्ता अधिकारी’पणाचा आदर्श ते जगून दाखवतायत.

त्यांचे आपण सत्कार करतो.

पण प्रशासनाशिवाय इतरही अनेक क्षेत्रांमध्ये चाणक्य मंडल परिवारमधून मनुष्यशक्ती जाते आहे. प्रतिभावंत काम करतो आहे. पत्रकारिता, साहित्य, कला, गिर्यारोहण, अभिनय, सामाजिक कार्य, लोकसंघटन अशा अनेक क्षेत्रांधे प्रतिभावंत कामगिरी करणार्‍यांचा आपण सत्कार करणार आहोत, त्यांच्या कामाविषयी जाणून घेणार आहोत, त्यांची मनोगतं ऐकणार आहोत.

ही ‘प्रतिभावंतांची मांदियाळी’ योजली आहे, दि. 27 फेब्रुवारी रोजी.

27 फेब्रुवारी ‘‘प्रतिभावंतांची मांदियाळी’’ गोळा व्हायला याहून दुसरा, सर्वोत्तम मुहूर्त कोणता सापडेल!

कवि कुलगुरू कुसुाग्रजांचा जन्मदिवस.

आणि तोच दिवस, सुदैवानं महाराष्ट्रानं सुदैवानं एकमतानं ठरवलाय ‘‘मराठी दिवस’’.

मराठी माणसाला शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक काम आखून दिलंय ‘‘हिंदवी स्वराज्या’’ साठी लढण्याचं- म्हणजे संपूर्ण भारतासाठी चिंतन आणि काम करण्याचं आणि ज्ञानोबा-तुकोबा या संतमंडळीनं ‘‘ईश्‍वरनिष्ठांची मांदियाळी’’ उभी करताना आपल्याला जीवित कर्तव्य जाणवून दिलं ‘‘अवघे विश्‍वचि माझे घर’’ साठी काम करण्याचं. वारकरी आणि धारकरी यांनी दिलेला वारसा आपल्याला वर्तान काळातही जीवनाच्या सर्व क्षेत्रात पराक्रम करण्याची प्रेरणा देतो, आत्मविश्‍वास देतो – नव्हे नव्हे – हे आपलं कर्तव्य असल्याची जाणीव करून देतो. आणि आधुनिक काळात, वर्तान काळात हा पराक्रम कसा करायचा

– तर आपल्या जिभेनं, मेंदूनं, पायानं, लेखणीनं – प्रतिभेचा आविष्कार, म्हणजे पराक्रम.

असा प्रतिभेचा आविष्कार करणार्‍या परिवार सदस्यांचा सत्कार, म्हणजे ‘‘प्रतिभावंतांची मांदियाळी’’.

चाणक्य मंडल परिवारच ‘‘प्रतिभावंतांची मांदियाळी’’ आहे. असायला पाहिजे. कारण केवळ प्रशासनच नाही, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आपल्या स्वतंत्र प्रज्ञेचा, प्रतिभेचा आविष्कार करेल अशी मनुष्य शक्ती चाणक्य मंडल परिवारातून तयार व्हावी, अशी आपली ‘‘व्हिजन’’ आहे.

म्हणून 21 वर्षांनंतर प्रथमच, अशा प्रतिभावंतांचा सत्कार कुसुाग्रजांची जन्मतिथी त्यामुळे ‘मराठी दिवस’ असलेल्या 27 फेब्रुवारी (2018) ला.

कुसुाग्रजांची ‘‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’’ हा फटका चाणक्य मंडल परिवारनं विचारपूर्वक आपलं अधिकृत गीत म्हणून स्वीकारलेला आहे. त्या फटक्यात सांगितलेला ‘सूर्यकुलाचा दिव्य वारसा’ समृद्ध करणार्‍या ‘प्रतिभावंतांची मांदियाळी’ मधे सामील व्हायला सुद्धा या,

आणि त्यापूर्वी ‘‘21 वे शतक भारताचे’’ असंही स्वप्न पाहणारे 6 जागतिक विषय ऐकायला या.

॥ 3 ॥

21 वे शतक भारताचे

आपल्या वैयक्तिक आयुष्यासकट महाराष्ट्र, भारत आणि जगासमोरचे 8 मुख्य विषय –

महासत्तांचा संघर्ष, पर्यावरण, जागतिकीकरण, लोकशाही, अणुविज्ञान-अण्वस्त्र, दहशतवाद, स्त्रीवाद-आणि, विज्ञान-अध्यात्म (हा एकरूप समास)

असे 8 दिवस.

त्या आठही विषयांधे भारताचं स्थान आणि मुख्य म्हणजे विषयांवर ‘भारतीय’ म्हणावी अशी वैश्‍विक ‘‘भारतीय’ भूमिका’ –

अशी सूत्रं घेऊन गेली 2 वर्षे आपण ‘‘जय भारत जय जगत’’ ही व्याख्यानमाला घेतली. मुलं त्याला सीझन 1 आणि 2 म्हणतात! आणि व्याख्यानांना एपिसोड! 1 ते 8! मैफल म्हणा. किंवा धर्माधिकारी बुवांचं कीर्तन. शिवाय एकपात्री प्रयोग!

जय भारत जय जगत ला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला.

आता जणू त्या सर्व मांडणीचा, विषयांचा समारोप – निष्कर्ष –

‘‘21 वे शतक भारताचे’’

या शीर्षकापुढे तुच्या श्रद्धेनुसार कोणतंही चिन्ह द्या – पूर्ण विराम, स्वल्प किंवा अर्ध विराम, उद्गार चिन्ह, प्रश्‍नचिन्ह – किंवा आता तर्‍हातर्‍हांचे ‘इमोजी’ उपलब्ध आहेतच!

म्हणून मी पुढे कोणतंच चिन्हं न ठेवता, अवतरणात, फक्त विषय सांगतोय.

‘‘21 वे शतक भारताचे’’

– भारत-चीन संघर्ष

–  पर्यावरण : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर (यात पॅरिस करार डिसेंबर 2015 पासून पुढची वाटचाल)

– जागतिकीकरण : घड्याळाचे उलटे काटे 2008 च्या सबप्राई क्रायसिपासून पुढची जागतिक

अर्थव्यवस्थेची वाटचाल

– अणुविज्ञान : विध्वंस की ऊर्जानिर्मिती

–  जय जय हे महिषासुरमर्दिनी – जागतिक आणि भारतीय स्त्रीवाद

आणि

– विज्ञान आणि अध्यात्माचे अद्वैत – त्यामधून आकाराला येणार सर्व धर्म-पंथांचं आणि मानवाचं

अद्वैत असे 6 विषय

जाणकारांना जाणवेल, की यावेळी ‘‘लोकशाही’’ आणि ‘‘दहशतवाद’’ हे विषय स्वतंत्रपणे योजलेले नाहीत, कारण ते बाकीच्या 6 विषयांत सतत येत राहतील. उदा. भारत-चीन या अटळ असलेल्या संघर्षाची एक, मुख्य, किनार – दोन परस्परविरुद्ध राजकीय व्यवस्था – लोकशाही विरुद्ध सर्वंकषवादी – एकपक्षीय हुकुमशाही, अशी आहेच. आणि या संघर्षात चीन, भारताविरुद्ध-पाकिस्तान, पाकपुरस्कृत दहशतवाद किंवा हिंसक डावा नक्सली दहशतवाद, वापरणारच.

यावेळी 6 विषय. 21 वे शतक भारताचं आणि तेच स्वप्न सोबत घेऊन आणखी 2 कार्यक्रम – संकल्प दिवस, आणि प्रतिभावंतांची मांदियाळी तारखा – वेळा आत्तापासून राखून ठेवा – जानेवारी 17, 18 आणि फेब्रुवारी 5, 13, 15, 20, 26 आणि 27.

वेळ – सायं ठीक 6 (म्हणजे 5.55)

स्थळ – गणेश कला क्रीडा सभागृह, पुणे

सर्वांना सस्नेह निमंत्रण

निद्रानाशाच्या विकारावरील अक्सीर इलाज! बोअर होण्यासाठी! सहनशक्तीची कसोटी पहाण्यासाठी, किंवा सहनशक्ती वाढवण्यासाठी अथवा – आवश्यकतेपेक्षा अधिक निद्रा येत असल्यास थोडी झोप उडण्यासाठी, सर्व या. इष्टमित्र सहवर्तान येण्याचे करावे. (आहेर आणू नये! आपली उपस्थिती हाच सर्वांत

उत्तम आहेर!) (घरचा!)

आलात तर आनंद आहे. नाही आलात तर,

दुःख आहे – पण त्याला आता काय करणार, सांगण्याचं काम माझं आहे,

सर्वांना सस्नेह निमंत्रण.

आणि

सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा

शाश्‍वत आणि बिनशर्त

– अविनाश धर्माधिकारी 

2 thoughts on “21 वे शतक भारताचे (माझे सर्वांना सस्नेह निमंत्रण)

 • January 7, 2018 at 8:50 pm
  Permalink

  #सर कार्यकर्ता अधिकारी यामध्ये अतिशय प्रभावीपणे आपण मत व्यक्त केले आहे.

  Reply
 • January 24, 2018 at 4:02 pm
  Permalink

  जय भारत जय जगत हि व्याख्यानमाला खूपच महत्वपूर्ण होती.
  मी सीजन 1 2 दोन्ही व्याख्यानाच्या 16 विषयांना उपस्थित होतो.
  सद्यस्थित जगासमोरचे 8 महत्वपुर्ण विषय असल्यामुळे सद्यस्थिती समजून घेण्यास मला या व्याख्यानाचा खूपच फायदा झाला.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *