शिका आणि शिकवा : एक अपूर्व अनुभव

शिका आणि शिकवा या उपक्रमाबद्दल वाचले आणि वाटले की काश्मीर समजून घेण्याची यापेक्षा उत्तम संधी मिळूच शकत नाही म्हणून या उपक्रमात सहभागी झालो. एखादी गोष्ट करण्याची मनात प्रबळ इच्छा असेल तर ती साध्य होतेच याची प्रचीती आम्हाला आली. आमचा दौरा जवळ-जवळ रद्द होण्याच्याच मार्गावर होता, पण सारंग सर आणि असीमच्या टीमने आमचे मनोबल वाढवले आणि येणार्‍या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत आम्ही उरीला पोहोचलो.

उरीमध्ये प्रवेश करतानाच Welcome to INDIA पाटी बघून खूप आनंद झाला. आपण सतत बातम्यांधून आझाद काश्मीरविषयी ऐकत, वाचत असतो. त्या मागण्या करणार्‍यांध्ये उरी तर नक्कीच नाही हे पाहून मनाला हायसं वाटलं. तेथील माणसांच्या बोलण्यातून सुद्धा एक प्रकारचा आपलेपणा आणि गोडवा जाणवला. आम्हाला तिथे वेगळ्या प्रांतातून आल्यासारखी वागणूक कोठेच नाही मिळाली. सागर डोईफोडे (SDM Uri) सरांच्या बोलण्यात आले होते की तेथील माणसं अगदी छोट्या छोट्या गोष्टींतही आपला आनंद शोधत असतात. जसे की एखादा ड्राइव्हर सुद्धा सुट्टीच्या दिवशी विरंगुळा म्हणून Fishing ला जातो. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पाहुणचाराची पद्धत, जी फारच खास आहे. आलेल्या पाहुण्यांना

ते स्वतः उत्साहाने खाऊ-पिऊ घालतात. त्यामुळेच आम्हाला अक्रोड ची चटणी, कढमची भाजी, काव्हा आणि चहासोबत मक्याची रोटी असे वेगळेच पदार्थ चाखायला मिळाले.

शिका आणि शिकवा यातील शिकवा भागामध्ये आम्ही उरी सेक्टरमधील वेगवेगळ्या शाळांध्ये विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. तेथील विद्यार्थ्यांना आम्ही करिअरच्या विविध संधी व स्पर्धा परीक्षांचा परिचय करून दिला. त्यातून असे जाणवले की तेथील विद्यार्थ्यांध्ये कला, कौशल्य आणि आत्मविश्‍वास खूप आहे, परंतु मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. आम्ही त्यांना गणिते सोडवण्याच्या काही मजेदार व सोप्या युक्त्यासुद्धा शिकवल्या. सागर सर व सारंग सर यांच्यासोबत झालेल्या चर्चांधून एक कल्पना समोर आली की काश्मीरमधील विद्यार्थ्यांना उर्वरित भारताशी जोडण्यासाठी व वेगवेगळ्या संधी मिळवून देण्यासाठी ‘नवोदय विद्यालय’ व ‘केंद्रीय विद्यालय’ यांसारख्या योजना अधिक प्रमाणात राबवल्या पाहिजेत. अशा संवेदनशील भागात शिक्षण किती मोलाची भूमिका बजावते हे दिसून आले. एक म्हणजे मुलं शाळेत गुंतून राहिली तर त्यांना वास्तविक गोष्टी अधिक कळतील आणि त्यांची दहशतवादाकडे वळण्याची शक्यता कमी होईल. दुसरे म्हणजे काश्मीरमधील बहुसंख्य लोक हे शेती केशर, अक्रोड, सफरचंद चे प्रमाण जास्त आहे. परंतु भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीमुळे वर्षातील काहीच महिने ते शेती करू शकतात. बाकी इतर महिने ते बेरोजगारच असतात आणि मग अशावेळी उदरनिर्वाहासाठी चुकीचे व हिंसक मार्ग निवडतात. विशेष म्हणजे यातून त्यांना पैसेसुद्धा मिळतात आणि म्हणून ते इकडे आकर्षित होतात. जर यावेळेत आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला तर?

शाळेमध्ये गेलो असताना शिक्षकांकडून आम्हाला एक प्रश्‍न विचारण्यात आला – ‘जो काश्मीर आपने मीडिया में देखा और सुना है, वैसा कुछ है यहाँ पे? खरंतर, हा प्रश्‍न विचारण्याची त्यांच्यावर वेळ यावी हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. तेथील मुलांनी विविध क्षेत्रांत मिळवलेले यश, लष्कर-प्रशासन व नागरिक यांच्या सहकार्यातून घडलेली कामे, केशर, सफरचंद, अक्रोड या फळांचे विक्रमी उत्पादन, काश्मीरची कला-संस्कृती, पर्यटन अशा सकारात्मक गोष्टीं प्रसार माध्यमे दाखवतच नाही. याउलट, काश्मीरचे एक हिंसक व नकारात्मक चित्रच नेहमी आपल्यासमोर मांडले जाते. नुकताच उरीमध्ये भव्य व सुंदर असा उरी मेला पार पडला. यात हजारांच्या संख्येने गावकरी सहभागी होते. मेला शांततेत व आनंदात पार पडला. आयोजन तर गावकर्‍यांनीच केले होते व एकत्र येऊन उत्सव साजरा करणे, कलागुणांचे प्रदर्शन करणे हा या मेल्याचा उद्देश होता. याचा उल्लेख मीडियामध्ये कोठेच झाला नाही.

असीमने सुरू केलेल्या उरीमधील अप्रतिम बेकरीला आम्ही भेट दिली. ज्या भागामध्ये अजूनही स्त्रिया हवे तेवढ्या सक्षम झालेल्या नाहीत, अशा ठिकाणी असीमने Woman Empowerment कडे एक पाऊल टाकले आणि ते यशस्वीसुद्धा झाले. आज तेथील बेकरीमधील सफरचंद आणि अक्रोडापासून बनवलेली अप्रतिम बिस्किटे महाराष्ट्रातसुद्धा येऊन पोहोचली आहेत.

 

‘‘पब्लिक दरबार’’ ही एक नवी संकल्पना आम्हाला तेथे पाहायला मिळाली. सामान्य नागरिक प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बसून चर्चेद्वारे आपल्या समस्या मांडतात. कमालकोटपासून थोडे पुढे एका गावात अशाच एका पब्लिक दरबारला आम्ही सागर डोईफोडे (SDM, URI) सरांसोबत गेलो होतो.

50-60 लोक जमले होते व त्यांच्या गावाचे एक प्रतिनिधी गावाच्या समस्या सागर सरांसमोर मांडत होते. गावकर्‍यांचे सर्व म्हणणे ऐकल्यानंतर सागर सरांनी त्यांना समस्यांवरचे तोडगे सांगितले. हे सर्व पाहताना आम्हाला एक जाणवले की कोणीतरी एक अधिकारी आपले म्हणणे ऐकून घेतोय, आपल्या प्रश्‍नांची उत्तरे देतोय या गोष्टीने सुद्धा त्यांना खूप समाधान मिळते. फक्त त्यांच्यासाठी तुम्ही काही करा अथवा नका करू, पण त्याचं म्हणणं ऐकून घेणारं कोणीतरी आहे ही भावनाच त्यांना अधिक दिलासा देते. आम्हाला हे सगळे पाहताना एक गोष्ट कळत होती की विकसित होण्याची तळमळ त्यांच्यात पण आहे. त्यासाठी ते प्रयत्नही करत आहेत, पण कुठेतरी प्रशासन व सरकार कमी पडते आहे.

दोन्ही बाजूंनी उंचच उंच डोंगर, त्यावर असलेली दाट झाडी, खळखळ वाहणारी झेलम नदी, थंडगार हवा, कोवळा सूर्यप्रकाश हे सर्वच इतकं नयनरम्य व सुखद होत की आम्हाला तेथून परत यावसंच नव्हतं वाटत. हा प्रवास एका चित्रपटातील सुंदर ओळींची आठवण करून देत होता- Journey itself is more beautiful

than the destination. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन शिकण्याची मजा आम्ही घेत होतो. झेलम नदीवर दोन भव्य वीजनिर्मिती प्रकल्प (NHPC) आहेत, ज्यातून जवळपास 720 चथ एवढी वीज निर्माण केली जाते. हे प्रकल्प उरीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. याच प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. Cross LoC Trade म्हणजेच काश्मीर व पाकव्याप्त काश्मीर अंतर्गत चालणार व्यापार पाहण्याची संधी आम्हाला मिळाली. या व्यापाराचा उद्देश नफा मिळविणे हा नसून दोन तणावग्रस्त भागांधील संबंध सुधारणे हा आहे. सध्या वृत्तपत्रांध्ये कलम 370 आणि 35(अ) रद्द करण्यात यावे अशी चर्चा सुरू आहे. अभ्यासातून आणि सागर सर व सारंग सर यांच्याशी झालेल्या चर्चांधून असे लक्षात आले की ही कलमे आता फक्त प्रतीकात्मक स्वरूपात उरलेली असून ती काढून टाकल्याने ना उर्वरित भारताला काही फायदा आहे ना काश्मीरला काही तोटा. उलट जर ही कलमे रद्द केली तर काश्मीरमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि यामुळे मग भारताविरुद्ध वातावरणाला खतपाणी मिळेल.

सागर सर आणि सारंग सर यांच्यामुळे आम्हाला काश्मीरकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला Things are not black or white over there, they are GREY. कुठल्याही निष्कर्षाला पोहोचण्याची घाई न करता. त्यामागचे नेके कारण काय असू शकते याचा विचार करणे. यापुढे काश्मीर तसेच कुठल्याही गोष्टीकडे बघताना हे सतत लक्षात ठेवू. काश्मीरकडे फक्त प्रश्‍न म्हणून न बघता तिथे शांती आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आपापल्या परीने जे जमेल ते केले पाहिजे. यात आपले योगदान म्हणून काश्मिरी माणसांशी संवाद साधणे, मैत्री करणे एवढे तर नक्कीच करू शकतो. असे केल्याने काश्मीर कायमस्वरूपी भारताशी एकरूप रहायला मदत होऊ शकते.

लेखक : सिद्धी काळभोर, रेणुका घोरपडे आणि टीम
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *