हाँगकाँग ओपन : सिंधू, समीरला रौप्यपदक

कौलून, 28 नोव्हेंबर : हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू व समीर वर्मा या दोघांनाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगसने समीरवर 21-14, 10-21, 21-11 अशी मात केली. तर महिला एकेरीच्या अंतिम लढतीत तैपेईच्या तै त्झू यिंगने सिंधूला 21-15, 21-17 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

1982 मध्ये प्रकाश पदुकोण यांनी ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एकाही भारतीय पुरुष स्पर्धकाला ही स्पर्धा जिंकता आली नव्हती. 2010 मध्ये सायना नेहवालने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले होते. या स्पर्धेतील पराभवामुळे भारताच्या समीर वर्माचे पहिलेवहिले विजेतेपद पटकाविण्याचे, तर पी.व्ही. सिंधूचे सलग दुसरे जेतेपद पटकाविण्याचे स्वप्न भंगले आहे. सायना नेहवालची कारकीर्द उतरणीला लागली असल्याचे दिसत असताना के. श्रीकांत, समीर वर्मा व पी. व्ही. सिंधू यांनी मात्र भारताचा ध्वज बॅडमिंटनमध्ये उंचावत राहील याची काळजी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *