सागरी सुरक्षेसाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई, 27 नोव्हेंबर : मुंबईच्या आणि सागरी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत असून, सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. सागरी कवचच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सुरक्षाविषयक विविध संस्थांमध्ये समन्वय आणि सनियंत्रण राखले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. काळा घोडा येथे आयोजित एका कार्यक्रमात त बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, 26/11 चा हल्ला कोणत्याही एका हॉटेलवर किंवा शहरावर झाला नव्हता, तर तो देशावर आणि देशाच्या आर्थिक राजधानीवर झालेला हल्ला होता. या हल्ल्यानंतर मुंबईच्या आणि समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

दोन वर्षांपूर्वी मुंबई सीसीटीव्हीच्या निगराणीसाखाली आणण्यासाठी पावले उचलली असून, भविष्यात सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. सुरक्षेसाठी किती निधी खर्च करावा यापेक्षा तो खर्च कसा करावा याकडे लक्ष देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर घेणार असून सागरी सुरक्षेसाठी मुंबईतील मच्छीमार बोटींना कलरकोडिंग करण्यात आले आहे. त्याचबरोबर मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्यात आले आहे. मुंबई परिसरात सहाशे निर्मनुष्य लँडिंग पॉइंट्स आहेत. या ठिकाणी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मनुष्यविरहित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सवर भर दिला जात आहे. मरीन लाइन्स येथील पोलीस स्मृतिस्थळावर जाऊन राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आठ वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई अतिरेकी हल्ल्यामध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीस दलातर्फे स्मृतिवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय, अप्पर मुख्य गृहसचिव के.पी.बक्षी, पोलीस महासंचालक सतीश माथूर मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर उपस्थित होते. आयसिससारख्या दहशतवादी संघटनेमध्ये तरुण ओढले जाऊ नयेत, यासाठी तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे.

धार्मिक भावना भडकावून आयसिस संघटना तरुणांना जाळ्यात ओढू पाहत आहे. मुख्यमंत्री म्हणाले माझे तरुणांना आवाहन आहे, की तुम्ही समाजाचे सदस्य आणि सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *