डेव्हिस चषक : अर्जेंटिना चॅम्पियन
झॅगरेब, 29 नोव्हेंबर : टेनिसपटू ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने 2014 मधील मनगटाच्या शस्त्रक्रियेनंतर रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावून टेनिसप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिलाच पण याचबरोबर टेनिसचा विश्वचषक समजल्या जाणाऱ्या डेव्हिस चषकामधील अंतिम फेरीत विजय मिळवून अर्जेंटिनाला डेव्हिस चषक सुद्धा मिळवून दिला आहे. अंतिम सामन्यात त्याने क्रोएशियाच्या मरिन चिलिचवर 6-7 (4-7), 2-6, 7-5, 6-5, 6-3 अशी मात केली. पोट्रोने अंतिम सामन्यात दोन सेटची पिछाडी भरून काढली. पोट्रोच्या या विजयामुळे अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला क्रोएशियाविरुद्ध बरोबरी साधता आली. यानंतर फ्रेड्रिक डेलबॉसिनने निर्णायक झुंजीत इव्हो कार्लसनवर विजय मिळवीत अर्जेंटिनाचा विजय साकारला.