जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद : कार्लसन वि. कार्जाकिन यांच्यात काँटे की टक्कर

न्यूयॉर्क, 28 नोव्हेंबर : नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि रशियाचा सर्जी कार्जाकिन यांच्यात सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीतील अकरावा डाव बरोबरीत सुटला. या लढतीतील आता अकरावी फेरी झाली असून आता केवळ एकच फेरी शिल्लक राहिली आहे. अकराव्या फेरीअखेर कार्लसन व कार्जाकिन दोघांचे समान 5.5 गुण झाले आहेत. यामुळे दोन्ही खेळाडूंचे आव्हान व लढतीतील चुरस कायम राहिली आहे.

अकराव्या फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांसहित खेळताना कार्जाकिनने पुन्हा एकदा ‘रूप लोपेझ’ पद्धतीचा अवलंब केला. या स्पर्धेत आतापर्यंत ही ओपनिंग सात वेळा खेळली गेली आहे. हा डाव 34 चालींअखेर बरोबरीत सुटला. दोन्ही खेळाडूंना संपूर्ण डावात वर्चस्व मिळू शकले नाही. अखेरच्या फेरीत कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांसहित खेळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *