चौरंगी हॉकी स्पर्धा : भारत पराभूत

मेलबर्न, 27 नोव्हेंबर : भारतीय पुरुष संघ चौरंगी हॉकी स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडने भारतावर 3-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळविल्यामुळे भारतावर ही नामुष्कीची वेळ ओढवली आहे.

अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने भारतास विजय मिळविणे महत्त्वाचे होते. भारताने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सत्रात भारतीय संघाने आक्रमक चाली रचल्या. मात्र गोल नोंदविण्यात त्यांना अपयश आले. अठराव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा फायदा रूपिंदर सिंगने उठविला व भारताचे खाते उघडले. चौथ्या सत्रात न्यूझीलंडने तुफानी खेळ करून 47 व्या व 48 व्या मिनिटाला लागोपाठ दोन गोल करून आघाडी मिळविली. तसेच 57 व्या मिनिटाला गोल करून आघाडी 3-1 इतकी केली. 59 व्या मिनिटाला रूपिंदर सिंगने गोल नोंदवला, पण भारताला बरोबरी नोंदवण्यात अपयश आले व पराभव पत्करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *