एआय्बीए युवा वर्ल्ड चॅम्पियनशिप : सचिन जगज्जेता

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : माजी वर्ल्ड ज्युनियर ब्राँझपदक विजेता बॉक्सर सचिन सिंगने एआय्‌बीए वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. युवा जगज्जेता होणारा तो तिसरा भारतीय ठरला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिनने क्यूबाच्या जॉर्ज ग्रिननला हरवून जेतेपद पटकाविले. याआधी ननॅओसिंग आणि विकास क्रिशन यांनी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावली आहे.

अंतिम सामन्यातला सचिनचा प्रतिस्पर्धी उंचीने कमी होता परंतु तो खूप ताकदीचा होता. पण रिंगमध्ये सचिन आत्मविश्वासाने वावरत होता. त्याने पदलालित्याचा उत्तम वापर केला. त्यामुळेच प्रतिस्पर्ध्याला सचिनच्या खेळीचा अंदाज येत नव्हता. भारताने या स्पर्धेत सुवर्णपदकासहित कांस्यपदकाचीसुद्धा कमाई केली आहे. जमन तन्वरने भारताला या स्पर्धेत कांस्यपदक मिळवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *